1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पर्यावरणीय प्रश्नाचा सामना करण्यासाठी ‘पंचामृत’ तत्त्वाचा आधार: पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM-modi
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील हवामान बदल शिखर COP 26 परिषदेला संबोधित केलं. त्यांनी ‘लाईफ’ या एका शब्दाची चळवळ जगात सुरू व्हावी, असं आवाहन केलं आहे. गेल्या काही दशकांपासून जागतिक तापमान वाढ होत असून ते जगासाठी अत्यंत धोकादायक आहे, याचा सर्वात मोठा प्रभाव विकसनशील देशांवर होतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ग्लासगो इथं सुरु असलेल्या COP 26 या हवामान बदल यासंबंधीच्या परिषदेमध्ये ते बोलत होते. भारत शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असून देशातील नागरिकांच्या गरजा ओळखून त्या दृष्टीने योजना आखत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जागतिक हवामान बदलाच्या प्रश्नावर कृती करताना मिटिगेशन जेवढं महत्व मिळत तेवढेच महत्व अडॉप्टेशन मिळत नाही.

त्यामुळे विकसनशील देशांवर अन्याय होतोय. वातावरण बदल किंवा जागतिक तापमानवाढ याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसतो, तेच याला सर्वात प्रथम बळी पडतात.”

Claim Free Bets

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील सीओपी २६ हवामान बदल शिखर परिषदेला संबोधित केलं. त्यांनी ‘लाईफ’ या एका शब्दाची चळवळ जगात सुरू व्हावी, असं आवाहन केलं आहे. लाईफ चा अर्थ म्हणजे ‘लाईफस्टाईल फॉर एनव्हॉयरमेंट’ असंही त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी जगासमोर भारताचं हवामान बदलाविषयी चे व्हिजन ठेवतानाच या पर्यावरणीय प्रश्नाचा सामना करण्यासाठी ‘पंचामृत’ तत्त्वाचा आधार घेत ५ आश्वासनंही दिलीत.

-भारत २०३० पर्यंत आपल्या अजीवाश्म ऊर्जा क्षमता (Non-Fossil Energy Capacity) ५०० गिगावॅटपर्यंत वाढवेल.

-भारत २०३० पर्यंत आपल्या एकूण उर्जेच्या गरजेपैकी ५० टक्के उर्जा गरज अपापरंपारीक (अक्षय) उर्जा स्रोतांपासून पूर्ण करेल.

-भारत २०३० पर्यंत एकूण संभाव्य कार्बन उत्सर्जनात १ बिलियन टन कपात करेल.5/6४.

-भारत २०३० पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेच्या कार्बन तीव्रतेला ४५ टक्के कमी करेल.
-भारत २०७० पर्यंत नेट झिरोचं लक्ष्य प्राप्त करेल.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    समलिंगी विवाह प्रकरणी सुनावणीच्या थेट प्रक्षेपणास के...

    May 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेल्या समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी या मागणी करणाऱ्या याचिकांवरील सुनावणी...

    माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही: सोनिया ग...

    October 18th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेस कार्यकारणीच्या बैठक झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक गे...

    प्रियांका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईल...

    January 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: उत्तर प्रदेश येथील येणारे विधानसभा निवडणुकांना घेऊन सर्वच पार्टीचे जोरदार तयारी सुरु आहे. अशातच काँ...