1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘बीग बी’ने रद्द केला ‘कमला पसंद’ चा करार

amitabh-bachchan
Spread the love

भारतात तसेच जगभरात कोट्यवधी चाहते असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. सध्या बिग कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासह, सोशल मीडियावरवरही सतत सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या कृतींनी आपल्या चाहत्यांना वेड लावत असतात. आता त्यांच्या अशाच एका कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रम अर्थात नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ टोबॅको इरॅडिकेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बिग बी यांनी कमला पसंद पानमसाला कंपनीसोबतचा करार रद्द केला आहे. आणि या कंपनीसोबतच्या कराराची उर्वरित रक्कमही त्यांनी कंपनीला परत केली आहे. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून स्वागत होते आहे.

राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी अमिताभ बच्चन याना अशाप्रकारच्या जाहिरातीतून माघार घेण्यासंदर्भात आवाहन करणारे एक पत्र लिहिले होते. जे माध्यमातून प्रसिद्धही करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी हा करार रद्द केला आहे.

अमिताभ बच्‍चन यांच्या विषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

अमिताभ बच्चन यांच्या निर्णयाचा मला आनंद झाला आहे आणि याचा समाजावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल अशी मला आशा आहे. त्यांच्या या निर्णयाचे इतर सिनेअभिनेते अनुकरन करतील अशीही अपेक्षा आहे, अशा भावना डॉ. साळकर यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रम हा देश तंबाखूमुक्त करण्याच्या अनुषंगाने राबविला जात आहे. त्यासाठी विविध पातळीवर जागृती केली जात आहे. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही गोव्यात अशा प्रकारच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची विनंती केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अमरावतीत आठ दिवसानंतर उघडली बाजारपेठ

    November 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंचारबंदी मध्ये मिळाली शिथिलता अमरावती मध्ये 12 आणि 13 तारखेला झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरांमध्ये सं...

    ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटावर केंद्राच्या महाराष्ट्रा...

    December 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनानंतर आता देशामध्ये ओमिक्रॉनने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरक...

    नागपूरतील भ्रष्टाचारास बसणार चाप, ‘फाईल ट्रॅकर...

    September 3rd, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveसरकारी काम आणि महिनाभर थांब, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे. कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात वि...