1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पाटणाच्या गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयाचा मोठा निर्णय

thumbnail-thefreemedia
Spread the love

आठ वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावर नरेंद्र मोदींच्या हुंकार सभेदरम्यान बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. एनआयए न्यायालयाने बॉम्बस्फोट प्रकरणी एका आरोपी फखरुद्दीनची सुटका केली आहे. त्याचबरोबर हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्दीकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलम यांच्यासह नऊ जणांना शिक्षा सुनावण्याची तारीख निश्चित केली आहे. शिक्षा 1 नोव्हेंबर रोजी सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 187 जणांची न्यायालयात सुनावणी झाली आहे.

पाटणा येथील गांधी मैदान पोलीस ठाण्यात गांधी मैदान सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणी 27 ऑक्टोबर 2013 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने 31 ऑक्टोबर 2013 रोजी या प्रकरणाचा ताबा घेतला आणि दिल्ली एनआयए पोलिस ठाण्यात 1 नोव्हेंबर रोजी पुन्हा एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये एका अल्पवयीन मुलासह 12 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच बरोबर, अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच जुवेनाईल बोर्डाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान यापूर्वीच या प्रकरणात आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांना अन्य एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये उमर सिद्दीकी, अझरुद्दीन, अहमद हुसेन, फक्रुद्दीन, फिरोज आलम उर्फ ​पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उर्फ​अब्दुल्ला उर्फ ब्लॅक ब्युटी, मोहम्मद आलम उर्फ पप्पू मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी ऊर्फ आलम यांचा समावेश आहे. यापैकी बोधगया साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी इम्तियाज, उमर, अझहर, मोजिबुल्ला आणि हैदर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोरोनामुळे विमानसेवेवर मोठा परिणाम

    January 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेचाही औरंगाबादच्या विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. विमान...

    राज्यात मास्क सक्ती;चौथी लाट येण्याचे संकेत

    April 27th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरली आणि त्यासोबतच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे. एकूणच पर...

    प्रियांका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईल...

    January 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: उत्तर प्रदेश येथील येणारे विधानसभा निवडणुकांना घेऊन सर्वच पार्टीचे जोरदार तयारी सुरु आहे. अशातच काँ...