1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपच्या जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय भूकंपाने वर्धा हादरले

Spread the love

राजीनामा देऊन नाराजी कळवली-डॉ शिरीष गोडे

गांधीजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी थेट भाजपला फारकत देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वर्ध्यातील या राजकीय भूकंपाने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे.

काँग्रेसच्या जनजागरण यात्रेदरम्यान वर्धा जिल्ह्यात भाजपला जबर धक्का बसलाय. काँग्रेसच्या प्रभातफेरीनंतर सकाळीच काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे करंजी भोगे येथे आले. त्यानंतर गोडे यांनी पालकमंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.- गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करताच राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

अस्वस्थता कळवली, मन वळवण्याचा प्रयत्नही झाला…

राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या डॉक्टर शिरीष गोडे यांनी 2008 मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राजीनामाही पाठवला होता कार्यवाहीच आश्वासन मिळाल्यानतर गोडे यांनी वेट अँड वॉच केलं. या कालावधीत गोडे यांच मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण बदल दिसत नसल्याचं सांगत अखेर डॉक्टर गोडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Claim Free Bets

शेवटी कंटाळलो आणि राजीनामा दिला

गोडे हे दोनवेळा भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. आताही त्यांच्याकडे भाजपचं जिल्हाध्यक्षपद होतं. भाजपची ध्येयधोरणं बदलली, पक्षाच्या आणि नेत्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला. जुना पक्ष राहिला नाही. यामुळे सहा महिन्यापासून व्यथित होतो वरिष्ठांना माहिती दिली पण कारवाई केली नाही. जनतेविरोधी, शेतकरी विरोधी धोरण राबवली जात . शेतकरी विरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याला कंटाळून राजीनामा दिल्याचं डॉक्टर गोडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    फरार अशिष मिश्राच्या घरावर पोलिसांनी चिटकविले समन्स

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या आरोपात केंद्रीय राज्य मंत्री अजय मिश्रा यांचा म...

    ‘इंदुमती कदम’ यांना लायन्स क्लब चा आदर्श...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपरभणी: शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी परभणी येथे लायन्स क्लब परभणीच्या वतीने 2021 चा जिल्ह्यास्तरीय आदर...

    राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला; देवेंद्र ...

    May 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनगपूर: मध्यप्रदेश सरकारने ट्रिपल टेस्ट केली म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणाची परवानगी मिळाली. महाराष्ट्राने ‘ट...