1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपुरात उभारणार कर्करोग रुग्णालय – अमित देशमुख

amit deshmukh2
Spread the love

नागपूर येथे कर्करोग रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असून लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी माहिती हिवाळी अधिशनादरम्यान दिली.

विधान परिषदेचे सदस्य गिरीश व्यास, डॉ. रणजित पाटील , अमरनाथ राजूरकर, नागोराव गाणार, अभिजीत वंजारी यांनी नागपूरमधील कर्करोग रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला होता.

यावर उत्तर देताना, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, की या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर कोरोनाची पहिली आणि नंतर दुसरी लाट आली. सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी व उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. नागपूर येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून कर्करोग इन्स्टिट्युट उभारण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. नागपूर येथील या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे, आस्थापनेवरील मनुष्यबळ या सर्वांसाठी प्रयत्न केले जातील.

70 टक्के कर्करोग हा जीवन पद्धतीशी संबंधित

देशात सर्वाधिक कर्करोगाचे प्रमाण हे तंबाखू खाणे, धूम्रपान करणे, अल्कोहोल घेणे यात आहे. 40 टक्के भारतातील जो कर्करोग आहे, तो डायरेक्ट तंबाखूशी संबंधित आहे. दुसरा प्रकार येतो लठ्ठपणा. लठ्ठपणा हा शहरीकरणामुळे वाढत चाललेला आहे. या लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणामुळे आपले फॅक्टसेल वाढल्याने कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढत जाते. 70 टक्के कर्करोग हा जीवन जगण्याच्या पद्धतीशी संबंधित असल्याने आपण काय खातो, कसे राहतो यावर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे आपण अमेरिकन जीवन पद्धती सोडून भारतीय पद्धतीच अवलंबली पाहिजे, अशी माहिती ज्येष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. मिनेश जैन यांनी दिली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राजकीय पेचातून चर्चेअंती मार्ग निघेल; शरद पवार

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: महाराष्ट्रात जे आता होतंय, ते गेल्या अडीच वर्षात दोनवेळा झालंय. हे तिसऱ्यांदा होतंय. सध्या महार...

    ‘ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची’ अशी सर...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत...

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रूपाने महाराष्ट्रात ...

    July 1st, 2022 | THE FREE MEDIA

    Spread the loveलोकशाहीचा खून, बंडखोरीचा विजय तर फडणवीस नाराज मुंबई: राज्यात मागील आठ दिवसांपासून सुरु असलेली राजकीय घडामोड...