1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अमेरिकेत करोना बळींची संख्या आठ लाख पार

Spread the love

गेले दोन वर्ष सर्व जगाला वेठीला धरलेल्या कोविड १९ ने अमेरिकेचा कणा मोडकळीला आला असून करोना मुळे देशात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. सोमवारी करोना संक्रमितांच्या संखेने पाच कोटींचा आकडा ओलांडला असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले असून वृद्ध आणि करोना लस न घेतलेल्या लोकांमुळे हा आकडा आणखी वाढेल असा इशारा दिला गेला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत २०२१ मध्ये अमेरिकेत करोना बळी अधिक आहेत आणि ज्या प्रमाणात संसर्ग वाढतो आहे त्यामुळे मृत्यूची आकडेवारी धोकादायक पातळीवर जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १ लाख मृत्यू केवळ ११ महिन्यात झाले आहेत. जॉन हापकीन ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डॉ. केरी एल्थोक यांच्या मते जो पर्यंत हर्ड इम्युनिटी येत नाही तोपर्यंत मृत्यूचा आकडा वाढत राहणार आहे. अमेरिकेत अजून हर्ड इम्युनिटी आलेली नाही. अमेरिकेत करोनाचा पहिला बळी सियाटल मध्ये ६५० दिवसांपूर्वी नोंदविला गेला होता मात्र अजूनही मृत्यू संख्येवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. फायझरच्या लसीला अमेरिकेने सर्वप्रथम मंजुरी दिली होती तेव्हाच मृत्युंची संख्या ३ लाखांवर होती. या वर्षी एप्रिल मध्ये मॉडर्ना आणि जोन्सनच्या लसीना मंजुरी दिली गेली आहे. या लसी सर्व वयोगटासाठी आहेत.

अमेरिकेच्या वॉशिंग्टन आणि बोस्टन या शहरांच्या लोकसंख्येपेक्षा करोना बळींची संख्या अधिक आहे. दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या अमेरिकन सैनिकांच्या दुप्पट ही संख्या आहे. करोना बळींच्या संख्येत ब्राझील दोन नंबर वर असून येथे ६ लाख १६ हजार मृत्यू झाले आहेत तर भारत तीन नंबरवर असून येथे ४ लख७५ हजार मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत ओमिक्रोनचा फैलाव ज्या वेगाने होत आहे ते पाहता करोनाचे ओमिक्रोन हेच मुख्य व्हेरीयंट बनू शकेल असे आरोग्य प्रमुख एन्थनी फाऊसी यांचे म्हणणे आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारताच्या २४८ प्राचीन मौल्यवान वस्तू अमेरिकेने केल्य...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमेरिकेने गुरुवारी भारताला चोरून अमेरिकेत नेल्या गेलेल्या २४८ प्राचीन मौल्यवान वस्तू परत केल्या असून या प्र...

    युक्रेन हल्ल्यात ‘परकीय भाडोत्री’ ठार

    March 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकीवने दावा फेटाळला कीव [युक्रेन]: रशियाने पश्चिम युक्रेनमधील यावोरिव्ह लष्करी प्रशिक्षण मैदानावर केलेल्या क...

    टाइम मॅगझिनने केली जगातील प्रभावशाली व्यक्तींची यादी...

    September 16th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी आणि भारताच्या सिरम इंस्टीट्युटचे सीइओ अदर पुनाव...