1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

युरोपच्या ५३ देशात वेगाने वाढतोय करोना

Spread the love

जागतिक आरोग्य संघटनेने केले जाहीर

सध्याच्या काळात भारतात करोना केसेस मध्ये घट दिसत असली तरी रशिया आणि चीन मध्ये करोना पुन्हा उग्र रूपात दिसत आहेच पण युरोपीय देशात करोना धोकादायक पातळीवर आणि अतिशय वेगाने हातपाय पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे भारतात सुद्धा पुन्हा एकदा करोना उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी करोना प्रतिबंध नियमांचे पालन करणे केव्हाही श्रेयकर असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत.

कोविड १९ प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक सुद्धा पुन्हा संक्रमित होत आहेत हा चितेचा विषय आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. युरोपच्या प्रमुख क्षेत्रात करोना केसेस, संक्रमण आणि मृत्यू संख्येत गेल्या आठवड्यात वाढ दिसून आली असून ५३ देशात करोना केसेस वाढल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक रिपोर्ट नुसार करोनामुळे होणाऱ्या मृत्युदरात युरोपीय देशात १४ टक्के वाढ दिसून आली असून १६ लाख नव्या केसेस समोर आल्या आहेत आणि २१ हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत.

गेल्या सात दिवसात या क्षेत्रात ५,१३,००० नवे रुग्ण अद्घाळले असून पूर्व युरोप मधील अनेक देशात संक्रमणात वाढ दिसून आली आहे. त्यांमुळे तेथे पुन्हा निर्बंध लागू केले गेले आहेत. रोमानिया, लातविया येथे हा दर अधिक असून लातविया पूर्व युरोप मधील लॉकडाऊन लागू करणारा पाहिला देश ठरला आहे. संपूर्ण युरोप मध्ये लसीकरणाचे प्रमाण ७४.६ टक्के आहे मात्र पूर्व युरोप देशात हे प्रमाण अवघे २४ टक्के आहे. रोमानियात करोना मृत्युदर सर्वाधिक असून तो १० लाख मागे १९.२५ मृत्यू असा आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे ११ दावेदार

    July 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love५ सप्टेंबरला घोषणा होण्याची शक्यता? ब्रिटनचे माजी पंतप्रधान ख्रिस पिंचर यांनी लैंगिक छळाच्या आरोपांमुळे आपल...

    तालिबान्यांकडून TOLO न्यूजच्या पत्रकारास बेदम मारहाण

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील पहिली स्वतंत्र वृत्तवाहिनी असणाऱ्या टोलो न्यूजच्या पत्रकाराची हत्या केल्याची ...

    संयुक्त राष्ट्र संघाचे ‘रेजिडेंट कोऑर्डिनेटर’ म्हणून...

    November 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अमेरिकेच्या शॉम्बी शार्प यांची भारतातील जागतिक संस्थेचे ...