1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोट्यवधींची मालमत्ता ‘अटॅच’

ajit pawar
Spread the love

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आयकर विभागाच्या रडारावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आयकर विभागाकडून त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता अटॅच करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीला हा दुसरा धक्का बसला आहे.

अजित पवारांच्या 1000 कोटींहून अधिक रकमेची संपत्ती आयकर विभागाच्या बेनामी प्रॉपर्टी सेलच्या वतीने अटॅच करण्यात आली आहे. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याची 600 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर दक्षिण दिल्लीमधील जवळपास 20 कोटींचा फ्लॅटही आयकर विभागाकडून अटॅच करण्यात आला आहे. यासोबत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं मुंबई स्थित कार्यालय निर्मल हाऊस, याची किंमत आहे जवळपास 25 कोटी रुपये ते देखील अटॅच करण्यात आले आहे. याशिवाय गोव्यातील रिसॉर्ट ज्याची किंमत आहे 250 कोटी रुपये हे देखील अटॅच करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्रातील 27 वेगवेगळ्या जमिनी ज्यांची किंमत जवळपास 500 कोटी सांगण्यात येत आहे, तीदेखील अटॅच करण्यात आली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    लष्कर भरती पेपरफुटी प्रकरणातील दोन माजी सैनिकासह एका...

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलष्कर भरती पेपरफुटी प्रकरणातील आरोपींनी उमेदवारांची मूळ कागदपत्रे ठेवून घेतली होती. आरोपींकडून ती कागदपत्रे...

    शेतक-यांना मदत मिळावी म्हणून उद्या मनसेचे ‘धरण...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हतबल बळीराजाला तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वती...

    ‘तो कार्यक्रम मनसेचा नाही’ वसंत मोरे नार...

    April 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमनसेकडून (MNS) उद्या पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (...