केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या गोव्यात येत असल्याने त्यांची ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी सभा आहे; त्यानिमित्त ताळगाव भागातील सर्व रस्त्यांची डागडुजी तसेच डांबरीकरण वेगाने सुरू आहे. राज्यात सगळीकडे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असताना केंद्रीय मंत्री येणार असल्याने मात्र या ठिकाणी ही दुरुस्ती केली जात आहे यामुळे जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
अमित शहांच्या दौर्यामुळे गोव्यातील खड्डे दुरुस्तीला लागला मुहूर्त
