1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सहा तास ठप्प पडली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा; झुकरबर्गला मोजावी लागली मोठी किंमत

Mark-Zukerberg
Spread the love

काल रात्रीपासून तब्बल सहा तासांसाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्यामुळे तसेच एका व्हिसलब्लोअरने कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मार्कला सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचे (४४ हजार कोटी रुपयांचे) नुकसान झाले आहे. यासंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे एक स्थानाने खाली घसरला. सध्या मायकोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यापेक्षा एका स्थानाने मार्क खाली आहे.

या कंपनीच्या शेअर्सची सोमवारी मोठी पडझड झाली. ४.९ टक्क्यांनी फेसबुकचे शेअर्स घसरले. कंपनीच्या शेअर्सला सप्टेंबरच्या मध्यापासूनच घरघर लागलेली असतानाच या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. कंपनीचे शेअर्स सप्टेंबरच्या मध्यापासून १५ टक्क्यांपर्यंत घसरले. मार्कची संपत्ती सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे १२ हजार १६० कोटी डॉलर्सवर आली. मार्क ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये एका स्थानाने खाली घसरला असून तो आला बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेला आहे. फेसबुकच्या सेवेमध्ये सोमवारी निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला.

काही कागदपत्रांच्या आधारे १३ सप्टेंबर रोजी वॉल स्ट्रीट जर्नलने आर्थिक व्यवहारांसदर्भात एक वृत्तांकन केले होते. यामधील एका लेखामध्ये खुलासा करण्यात आलेला की फेसबुकला त्यांच्या प्रोडक्टमधील कमतरता ठाऊक आहेत. तरुणांच्या मानसिक आरोग्यावर या कमतरतांमुळे परिणाम होत आहे. याच अहवालामध्ये या माध्यमावरुन ६ जानेवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च सदनामध्ये म्हणजेच कॅपिटल हिल्सजवळच्या दंगलीसंदर्भातील चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचाही उल्लेख आहे. सरकारी अधिकारीही या खुलाश्यानंतर सतर्क झाले. त्यानंतर सोमवारी ही गुप्त माहिती उघड करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचाही खुलासा करण्यात आला. याच कारणामुळे फेसबुकच्या शेअर्समध्ये पडझड दिसून येत आहे.

सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती मार्क झुकरबर्गनेही फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. या सेवा आज झालेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असे मार्कने म्हटले आहे.

Claim Free Bets

फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअ‍ॅप या समाजमाध्यमांची तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील सेवा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सेवेत तांत्रिक बिघाडामुळे व्यत्यय आल्याचे सांगण्यात येत असले तरी कंपनीने नेमके कारण मात्र उघड केलेले नाही. ‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला. नवे संदेश मिळत नसल्याची तक्रार लाखो वापरकर्त्यांनी केली.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युक्रेन संघर्षावरील चुकीच्या माहितीचा सामना करण्यासा...

    May 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: ट्विटरने सांगितले की ते युक्रेन संघर्षाबद्दल काही दिशाभूल करणाऱ्या कॉन्टेन्टवर चेतावणी सूचना देणे स...

    आता Gmail वरून कॉल करू शकता….!

    December 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआता Gmail वरूनही कॉल करता येणार आहेत. गुगलने ही सुविधा सुरू केली आहे. Google चे हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी त...

    चीनी भाषेमुळे सुंदर पिचाईनी लावला गुगल ट्रान्सलेटचा शोध

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगरज ही नवीन शोधाची जननी असते असे म्हटले जाते. भारतीय वंशाचे आणि अल्फाबेट या नामवंत सोफ्टवेअर कंपनीचे सीईओ स...