1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बाबासाहेब पुरंदरेंची ‘ती’ इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा; उदयनराजेंची भावूक मागणी

babasaheb purandare
Spread the love

ज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात बाबासाहेबांच्या पर्वती इथल्या घरी येऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारकडे बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करण्याची भावूक मागणी केली आहे.

बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे शिवप्रेमींच्या स्वप्नातल्या शिवसृष्टीच्या निर्माणाला सुरुवात झाली. राज्य शासनाला, केंद्र शासनाला तसंच जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की, त्यांची ही इच्छा, फक्त त्यांचीच नव्हे तर ज्या कोणाचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, जे त्यांना गुरुस्थानी मानतात त्यांची ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण होण्याकरता आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी उदयनराजेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, आमच्या कुटुंबातले एक घटक आदरणीय सन्माननीय, पूज्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली न भरुन येणारी ही पोकळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जे दुःखाचं सावट आलेलं आहे, त्यात मी आणि माझे सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘मोदी राष्ट्रपती आणि योगी पंतप्रधान होतील’ राकेश टिक...

    January 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदिल्ली : भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ते राकेश टिकैत हे गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचे नेते म्हणून उदय...

    करचुकवेगिरी केल्यास छापेमारीत सर्व मालमत्ता जप्त होणार

    February 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिली : यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल होईल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र, आयकरात ...

    चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड; चि...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली...