1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Google, WhatsApp कडून नियमांचं पालन न करणा-या 22 लाख भारतींयावर कारवाईचा बडगा

Spread the love

गुगलचे नियम तोडणाऱ्यांना कंपनीने जोरदार दणका दिला आहे. नवीन आयटी नियमांनुसार WhatsApp आणि गुगलचे नियमांचे पालन न करणाऱ्या गुगल आणि WhatsApp यूजर्सवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये, Google ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सुमारे 76,967 लोकांवर कारवाई केली असून त्यांना ब्लॉक केले आहे . दुसरीकडे, फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsAppने सुमारे 22 लाख WhatsApp अकाउंट्सवर बंदी घातली आहे. गुगल आणि WhatsAppने त्यांच्या मासिक अहवालात याबाबतीत खुलासा केला आहे.

गुगलला सप्टेंबर महिन्यात यूजरकडून 29,842 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . यापैकी गुगलला 76,967 सामग्री चुकीची असल्याचे आढळून आले आणि कंपंनीने अशा अकाउंट्सना ब्लॉक केले आहे . गुगलने आपल्या मासिक अहवालात याचा खुलासा केला आहे. यातील बहुतांश तक्रारी थर्ड पार्टींशी संबंधित आहेत, ज्या स्थानिक नियमांच्या विरोधात आहेत. तसेच यात काही तक्रारी पेटंट आणि पायरसीच्या देखील आहेत.

Google कढे आलेल्या तक्रारी

कॉपीराइट – 76,444

ट्रेडमार्क -493

Claim Free Bets

ग्राफिक सेक्सुअल कंटेंट -11

कोर्ट आर्डर -10

काउंटरफीट – 5

तर WhatsAppने 22 लाखांहून अधिक WhatsApp अकाउंट बॅन केले आहेत. याबाबत कंपनीने सांगितले की, युजर्सची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या खात्यांची संख्या 22 लाख 9 हजार आहे. व्हॉट्सअपनुसार, सप्टेंबरमध्ये 560 यूजर्सच्या तक्रारी आल्या होत्या. व्हॉट्सअपच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत WhatsApp ने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट आणि तज्ञांमध्ये सतत गुंतवणूक केली आहे जेणेकरून ते वापरकर्त्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षित ठेवण्यासाठी, स्वयंचलित मार्गाने बनावट पोस्ट आणि सामग्री ओळखण्यासाठी मदत होईल आणि नियम मोडणाऱ्यांवर योग्य कारवाई करता येईल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Google Pixel 6A लवकरच भारतात होणार लॉन्च : अहवाल

    May 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : Google ची Pixel 6-सिरीज भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये उपस्थित नाही. Pixel 6 किंवा Pixel 6 Pro घेण...

    जरेंडश्वर साखर कारखान्यावर छापे; आयकर विभागाच्या रडा...

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात सध्या ईडीच्या रडारवर राज्यातील अनेक मंत्री आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर...

    अलेक्सा व्हॉईस असिस्टंट वापरकर्त्यांना अमेझॉन देणार ...

    June 23rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: अमेझॉन एक योजना आखत आहे ज्यामुळे अलेक्सा व्हॉईस असिस्टंट वापरकर्त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्या...