1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राम रहीम सिंग यास CBI कोर्ट आज सुनावणार शिक्षा

Ram-Rahim- Singh
Spread the love

बहुचर्चित डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. आणखी एका गुन्ह्यात हरियाणा विशेष सीबीआय न्यायालय गुरमीत राम रहीम याला रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात शिक्षा ठोठावणार आहे. या खटल्यात गुरमीत याच्यासह इतरही 4 जणांना शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंचकूला पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पोलिसांनी 17 नाके आणि जवळपास 700 पोलीस तैनात केले आहेत. गुरमीत राम रही सध्या सुनरिया कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. हत्या प्रकरणात गुरमीत याला आता तिसऱ्यांदा शिक्षा ठोठावली जाणार आहे.

गुरमीत राम रहीम याचे एकूण वर्तुळ आणि त्याला यापूर्वी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेवेळी झालेला गोंधळ ध्यानात घेऊन पोलिसांनी चोख सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. या आधी जेव्हा गुरमीत राम रहीम याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हा त्याच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला होता. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या.

रणजीत सिंह हत्याकांड प्रकरणात कोर्टाने रहीम सिंह आणि कृष्ण कुमार यांना कोर्टाने 8 ऑक्टोबर रोजी दोषी ठरवले होते. भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या), 120-बी (गुन्ह्याबाबत कट रचने) या आरोपाखाली दोषी ठरवले होते. तसेच, याच प्रकरणात अवतार, जसवीर आणि सबदिल यांनाही कोर्टाने भारतीय दंड संहिता कलम -302, 120-बी आणि आर्म्स एक्ट अन्वये दोषी ठरवले आहे.

Claim Free Bets

या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे होणार आहे. राम रहीम व्हीडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर होईल. यात एक वकील त्याच्या वतीने सीबीआय न्यायालयात हजर राहील. दोषी कृष्ण कुमार, अवतार, जसवीर आणि सबदिल यांना कोर्टासमोर हजर केले जाईल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारतात घुसणा-या पाकिस्तानी बोटीसह 12 जण अटकेत

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय तटरक्षक दलाने गुजरातमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीला पकडलं आहे. तसेच, या बोटीवर असलेल...

    दहा वर्षात देशातील झोपडपट्ट्यांच्या संख्येत घट

    March 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाच्या शहरी भागात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाच्या 58 व्या ...

    औषधी कंपन्यांच्या फसव्या जाहिरातींवर होणार कारवाई

    March 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveऔषधांविषयीच्या जाहिरातींचे नियमन, औषधे आणि जादुई प्रभाव असणारे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954 अंतर...