1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अजुनही मीच काँग्रेसची अध्यक्षा आहे”; सोनिया गांधींचे

sonia-gandhi
Spread the love

विविध राज्यांमधील काँग्रेसमधील गोंधळादरम्यान शनिवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली. पूर्णवेळ अध्यक्षपदाची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता, सोनिया गांधी यांनी त्या काँग्रेसची स्थायी अध्यक्ष असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि संघटनेच्या निवडणुका लक्षात घेऊन आयोजित केलेल्या या बैठकीत सोनिया गांधींनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याला पक्षाचे पुनरुज्जीवन हवे आहे पण या ऐक्यासाठी आणि पक्षाचे हित असणे आवश्यक आहे असे म्हटले.

‘जी -२३’ नेत्यांच्या समोरच सोनिया गांधी यांनी मी पूर्णवेळ आणि व्यावहारिक काँग्रेस अध्यक्ष आहे असे म्हटले. “मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिक चर्चा करूया,” असे सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच संघटनात्मक निवडणुका आणि अध्यक्षांच्या निवडीबाबत सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. “आम्ही ३० जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता, पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली. आज स्पष्टता आणण्याची संधी आहे,” असे सोनिया गांधी म्हणाल्या.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    लष्करातील ३९ महिलांना सर्वाच्च न्यायालयाचा दिलासा; म...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलष्करातील ३९ महिला अधिकाऱ्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. या महिला अधिकाऱ्यांना एका ...

    द्रौपदी मुर्मू भारताच्या वाईट तत्वज्ञानाचे प्रतिनिधि...

    July 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: काँग्रेस नेता आणि प्रवक्ता अजय कुमार यांनी एका नव्या वादाला सुरवात केली आहे. त्यांनी म्हटले कि एनडी...

    ..तर, इलेक्ट्रीक गाड्या खरेदी करा; इंधन दरवाढीवर गडक...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढ आता नवनवीन उच्चांक करताना दिसत आहे. त्यातच केंद्...