1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वाचाळांना उत्तर देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; फडणवीस – मलिकांचा वाद शिगेला

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्जसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी देखील नवाब मलिकांना आव्हान दिलं आहे. या सर्व प्रकरणावरुन नवाब मलिक आणि फडणवीसांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता पुन्हा मलिकांवर टीका केली आहे. ते 2 दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पणजी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मलिकांवर निशाणा साधला आहे. ‘मी कोणता कलगीतुरा रंगवत नाही. मला जे बोलायचं होतं ते मी काल बोललो आणि जे बोलायचं आहे ते दिवाळीनंतर बोलणार आहे. त्यामुळे ‘वाचाळांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही’. त्यांच्या जावयाची कोर्टात केस सुरु आहे हे त्यांनीच सांगितलं आहे. मी माफी मागायचा सवालच येत नाही, माफी मागायची वेळ त्यांच्यावरच येईल’, असं म्हणत फडणवीसांनी मलिकांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. जयदीप राणा हा भाड्यानं आणलेला माणूस आहे, असं रिव्हर मार्चने स्पष्ट केलंय. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. मलिकांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर बाँब फोडणार,’ असे वक्तव्य केले होतं. आता फडणवीस दिवाळीनंतर नेमकं काय बोलणार आणि त्याचा महाविकास आघाडीला काय धक्का बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘रोप- वे ने जोडले जाणार रेणुका माता मंदिर̵...

    September 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील रेणुकामाता मंदिर आता एका रोप-वे ने जोडण्याची तयारी केली जात आहे. महाराष्ट्र सरकार आणि मोदी स...

    Omicron Variant: 295 प्रवासी परदेशातून मुंबईला परतले...

    December 7th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveओमिक्रोन कोरोनाव्हायरसचा एक नवीन आणि धोकादायक प्रकार, संभाव्यपणे देशाला त्याच्या नियंत्रणाखाली घेत आहे. कोर...

    पहिली विकेट पडली आता कॅप्टनसह सगळे याच मार्गाने जाती...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमनी लाँड्रिंग आणि १०० कोटी वसुली प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचा...