1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतं; देवेंद्र फडणवीस

Spread the love

मी मुख्यमंत्री नाही हे मला जनतेने जाणवूच दिलेलं नाही असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या प्रचारामुळे गाजलेले आणि प्रचंड टीका झालेले देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत हे वाक्य बोलून गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.

नेमकं काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

‘पाटीलसाहेब आणि गणेश नाईक आहेत. तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे. गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलेलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी आशीर्वाद घ्यायला इथेच येणार आहे’

नवी मुंबईत महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या नवरात्रोत्सव गोवर्धनी मातेच्या दर्शनाला देवेंद्र फडणवीस आले होते. नवी मुंबई शहरातील कामाचे कौतुक करत त्यांनी देशातील सर्वात स्वच्छ शहर असल्याचा गौरव फडणवीस यांनी करत आगामी मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकत युवक जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्या नवरात्र उत्सवास आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या निमंत्रणावरून वाशी येथे फडणवीस यांनी भेट दिली

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गानकोकीळा लता दिदी ’93 नॉटाऊट’; जेव्हा ...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताचे हृदय असलेल्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांचा 93 वा वाढदिवस 28 सप्...

    सावरकरांच्या होणा-या अपमानावर आम्हाला बोलता आले नाही...

    July 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिव...

    लखीमपूर हिंसाचार; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्यांसोबत लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस ने...