1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतीय पर्यटकांनी जम्मू काश्मीरमध्ये यावे…!!

Spread the love

जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिन्यात विविध सण, महोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून पर्यटनाशी संबंधित घटकांचे ९५ टक्के तर पर्यटन विभागातील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे, पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू आणि काश्मिर तसेच तेथील लोक उत्सूक आहेत, असे आवाहन काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू आणि जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ट्रॅव्हल एजन्ट्स असोसिएशन ऑफ काश्मिरचे अध्यक्ष फारुख कुथू, जम्मू आणि काश्मिरचे मुंबई येथील सहायक पर्यटन अधिकारी बशीर अहमद वानी यावेळी उपस्थित होते.

काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू म्हणाले की, जम्मू-काश्मिर आणि महाराष्ट्रामध्ये खूप जुने संबंध आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरला नेहमीच पसंतीचे स्थान दिले आहे. माता वैष्णोदेवी, हजरतबल दर्गा यांसारखी धार्मिक पर्यटनस्थळे, पहलगाम, सोनमर्ग, दल सरोवर, गुलमर्गसारखी विपुल नैसर्गिक सौंदर्य लाभलेली स्थळे यासह इथली खाद्यसंस्कृती, हस्तकला, पारंपारिक संगीत-नृत्य हे सर्व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.

आता कोरोनापश्चात काळात येथील पर्यटनाला पुन्हा बहर येत असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. पर्यटकांनी लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी केली असल्यास उत्तमच होईल. पण हे केले नसले तरी पर्यटक तिथे येऊ शकतात. तिथे आल्यानंतर अँटीजेन चाचणी करुन पर्यटकांना पर्यटनासाठी संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारतात २४ तासात ओमिक्रॉनचे १६,७६४ नवे रूग्ण

    December 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात शुक्रवारी गेल्या 24 दिवसांत 16,764 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, तिसऱ्या दिवशी वाढ होऊन देशातील...

    ‘राष्ट्रपती राजवट लावणे सोपे नाही’; गृहम...

    April 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदिलीप वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्यांना खडसावलं मुंबईत शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेला राडा शनिवारीही सुर...

    पेट्रोल, डिझेलचे दर लवकरच होऊ शकते कमी

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशातील नागरिकांसाठी महत्वाची खुशखबर असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते की,पेट्रोल व डिझेलचे दर लवकरच कमी...