The Free Media

thumbnail-thefreemedia

हिंगणा: संविधान साक्षर ग्रामपंचायत मंगरूळ (निलडोल पन्नासे) च्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले, त्यागमूर्ति माता रमाई आम्बेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मंगरूळ च्या सरपंच्या कविताताई सोमकुंवर,अतिथी म्हणून उपसरपंच ईश्वरजी काळे, ग्रामपंचायतच्या सचिव धारापुरे मैडम, सामाजिक कार्यकर्ते उद्धवजी बडगे, प्रमुख उपस्थि म्हणून आशावर्कर पर्यवेक्षिका प्रतिभा वड, आंगनवाडी सेविका काळे, वैशाली सोमकुंवर, रंजना चौधरी, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे चे हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी स्थान भूषविले.

कार्यक्रमाप्रसंगी समाज प्रबोधन करतांना प्रबोधनकार समतादूत सतीश सोमकुंवर यांनी जागतिक महिला दिनाची थोडक्यात पार्श्वभूमि विशद करतांना सांगितले की,८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली.

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. या ठरावानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

त्यानंतर पुढे जगभरात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा​ होऊ लागला. भारतात मुंबई येथे ८ मार्च १९४३ साली पहिला जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला. यूनोने १९७५ हे जागतिक महिला वर्ष म्हणून जाहिर केले. अशातरेने ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा केला जावू लागला. तसेच भारतात स्त्रीयांवर होणार अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी व भारतात स्त्रीयांची प्रगति होण्यासाठी भारतीय संविधान व महात्मा फुले सवित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतिचे फार मोठे योगदान आहेत. आज स्त्रीयांच्या उन्नतीसाठी राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले, त्यागमूर्ति माता रमाई आम्बेडकर यांचे विचार फार मोलाचे आहेत .असे मत व्यक्त करत महत्वाचे प्रसंग, उदाहरण व कार्याचे दाखले देत उपस्थित महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच कविता सोमकुंवर, आणि प्रतिभा वड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सदस्य गण, कर्मचारी धीरज वानखेडे, अमित बागड़े, रामुभाऊ, व प्रदन्याशील स्वयं सहाय्यता गट, यशोधरा स्वयं सहाय्यता गट, दामिनी स्वयं सहाय्यता गटातील अध्यक्ष /सचिव, सदस्य, ग्रामस्थ महिला मंडळीनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन आंगनवाड़ी सेविका काळे यांनी केले. तर आभार रंजना चौधरी यांनी मानले.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Shiv Sena-sanjay-raut-thefreemedia

बंडखोर व गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद – खासदार विनायक राऊत

शिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शिवसेनेचं नाव

Read More »
Chief Minister Shinde-thefreemedia

सावरकरांच्या होणा-या अपमानावर आम्हाला बोलता आले नाही; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर

Read More »
stratup-thefreemedia

स्टार्टअप आणि युनिकॉर्न हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे नवीन चालक

नवी दिल्‍ली: केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाने नवीन संधी उपलब्ध करून आणि देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे चालक म्हणून युवावर्गाला प्राधान्य देऊन देशाच्या आर्थिक परीदृश्यात विस्मयकारी परिवर्तन

Read More »

Latest News