नागपूर: गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जीओची मोबाइलला आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने जिओ युझर्स चांगलेच वैतागले होत्व. त्यानंतर आता टेलिकॉम ऑपरेटर एरटेलची मोबाईल आणि ब्रॉडबँड सेवा शुक्रवारी सकाळी अचानक ठप्प झाली. त्यामुळे एअरटेल यूझर्सला मोबाईल कॉलिंग, मोबाईल वायरलेस आणि ब्रॉडबँड सेवेद्वारे इंटरनेट सेवा वापरण्यात मोठी अडचण झाली. त्यामुळे सकाळपासून ट्विटरवर #airteldown हा हॅशटॅग ट्रेंड होत होता.
Downdetector च्या अहवालानुसार, Airtel ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा आज 11 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.50 वाजल्यापासून काम करत नव्हती. एअरटेलची सेवा सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. संपूर्ण भारतात 11:18 पर्यंत 3,729 युजर्सनी त्यांच्या कनेक्शनमध्ये आउटेज झाल्याची तक्रार नोंदवली होती. अनेक युजर्सनी सांगितले की, या महिन्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने अनेकांनी ट्विटरवर मिम्स लोकांनी शेअर केलेत.
Airtel killing everyone's internet in the morning #Airtel #AirtelDown pic.twitter.com/Yy1D3YM1Io
— Krishna (@Krishnehh) February 11, 2022
People shocked over #airteldown issues. Le Vodafone : pic.twitter.com/R1koNkLht6
— Amit Sarda (@amit4738) February 11, 2022
#AirtelDown
— Shruti (@kadak_chai_) February 11, 2022
Vodafone users to airtel users pic.twitter.com/MR0cys7jdh
#AirtelDown is trending.
— Innocent Child (@bholaladkaa) February 11, 2022
Flight Mode to me :- pic.twitter.com/fAVaovx5Js
मुंबईत रिलायन्स जिओ सेवेत बिघाड झाला होता. ट्विटर युजर्सच्या वतीने, मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर एअरटेल सेवा बंद झाल्याची माहिती सातत्याने दिली जात होती. मात्र ही समस्या सुमारे 1 तास होती. आता एअरटेल ब्रॉडबँड, मोबाईल सेवा पुन्हा सुरू झाली आहे.
एअरटेल ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा बंद केल्याप्रकरणी एअरटेलने ट्विटरवर एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. आमच्या इंटरनेट सेवांमध्ये तात्पुरता व्यत्यय आला आणि तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता सर्व सेवा सामान्य झाली आहे. एअरटेलची सेवा बराच काळ विस्कळीत झाली होती. मात्र याबाबत कंपनीने सध्या तरी कोणतीही माहिती दिलेली नाही.
Our internet services had a brief disruption and we deeply regret the inconvenience this may have caused you. Everything is back as normal now, as our teams keep working to deliver a seamless experience to our customers.
— Airtel Cares (@Airtel_Presence) February 11, 2022