1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कांचनगंगात पो. उप. नि. अमृता सूर्यवंशी यांनी केली तरूणींची कानउघडणी

Spread the love

१५ ते १७ वयोगटातील मुलींच्या मार्गदर्शनसाठी अचानक भेट

नागपूर/हिंगणा: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा एक्टीव्ह मोडमध्ये आली असल्याने, ग्रामीण भागातही गुनेहेगारी प्रवृत्तीला चाप बसावा यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून त्या अनुषंगाने मागील काही दिवसापासून हिंगणा तहसील अंतर्गत घडणा-या लहान मोठ्या घडामोडीवर पोलीस विशेष लक्ष देऊन आहे. या निमित्ताने पोलीस उप निरीक्षक अमृता सूर्यवंशी यांनी मोंढा येथील कांचनगंगा टाऊनशीप येथे आज अचानक भेट देऊन १५ ते १७ वयोगटातील तरूणींना मार्गदर्शन केले.

हिंगणा स्थित कांचनगंगा सोसायटी ही तालुक्यातील मोठी टाऊनशीप असून येथे बरीच कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यापैकी काही फ्लैट धारकांनी एजंटच्या माध्यमातून भाडेतत्वावर फ्लैट तालुक्यातील विविध कॉलेजात शिकत असलेल्या तरूण तरुणींना फ्लैट भाड्याने दिले आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना रूगणसंख्या कमी असल्याने जिल्हाधिका-यांनी शाळा, कॉलेज उघडण्यास परवानगी दिली असल्याने महाविद्यालयीन तरूण तरूणींच्या हुल्लडबाजीला ऊत आल्याचे चित्र परीसरात दिसायला लागले आहे.

शहरातील किंवा इतर तालुक्यातून पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी हिंगणा येथे मुलींना शिक्षणासाठी पाठवित असतात परंतु खर्चिक बाब असल्याने त्यांना कांचनगंगा व इतर सोसायटीत भाडेकरू म्हणून शिक्षणासाठी सोय करून देतात. परंतु वयात आलेल्या मुली कॉलेजच्या निमित्ताने इतरत्र उनाडटप्पू मुलांसोबत भटकतांना दिसतात हे त्यांच्या करीयरच्या दृष्टीने योग्य नसल्याची खंत पो उ नि अमृता सूर्यवंशी यांनी बोलून दाखवली. सोसायटीतील सर्व तरूण शिकाऊ मुला मुलींना मार्गदर्शन म्हणून आज त्यांनी भेट देत योग्य सल्ला देऊन मुलींची समजूत काढून त्यांना त्यांच्या पालकांच्या तळमळीची जाणीव करून दिली.

Claim Free Bets

अचानक दिलेल्या मारागदर्शनपर भेटीत सोसायटीतील शिक्षणप्रेमी तसेच ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंगणा पोलीस प्रशासनातर्फे पो उप नि अमृता सूर्यवंशी यांच्यासह अतुल तलमले, शेख इस्माईल, विनोद दुरतकर आणि चमू उपस्थित होती.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वाडीच्या आंबेडकर नगरातील डंपिंग यार्ड तात्काळ हटविण्...

    June 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर/वाडी :- बहुजन समाज पार्टी वाडी शहर नागपूर व स्थानिक नागरिकांच्या वतीने आज चंद्रमणी चौक आंबेडकर नगर व...

    नागपूर मनपाचा ‘खूर्चीवाद’ चव्हाट्यावर

    June 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर : सत्ता लालसेपोटी कोण कोणत्या स्तारावर पोहचेल हे सध्याच्या घडीला सांगता येणे अशक्य असून याचे मूळ कार...

    नागपुरात नागरिकांना आजपासून लसीचे दोन डोज अनिवार्य

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश...