1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो; मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar
Spread the love

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकार विरोधात टीकेची झोट उठवत होते. केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीवर राज्यातील राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकही आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळाले. त्यातच आता माजी केंद्रीय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी अर्थमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राज्यातल्या जनतेला स्वस्तात पेट्रोल देण्याची इच्छाशक्ती राज्य सरकारने दाखवली तर राज्यात पेट्रोल 20 रूपयांनी कमी होऊ शकते, असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी कमी करून दाखवतो, असा दावा मुनगंटिवार यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेता येत नसल्याने पेट्रोलचे दर चढे आहेत, अशी टीका यावेळी मुनगंटीवारांनी केली आहे.

Claim Free Bets

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारला जबाबदार धरणाऱ्या राज्य सरकारने पेट्रोलवर जवळपास 32 रूपये कर लावला आहे. हा कर कमी केला तर राज्यात पेट्रोल वीस रूपयांनी कमी होऊ शकते. वस्तू व सेवा करात (जीएसटी) पेट्रोल-डिझेलचा समावेश केला तर दरात आणखी कपात होऊ शकते. मात्र, केंद्राला जबाबदार धरणारे राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचा जीएसटीत समावेश करण्यास विरोध करीत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चंद्रकांत पाटील यांनी पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा...

    अनिल देशमुखांना फरार घोषित करून; त्यांची पूर्ण संपत्...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही...

    विधानसभेला आम्ही 170 जागा घेणारच; चंद्रकांत पाटील

    June 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यात 2024 मध्ये होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. महाविकास आघाडीती...