नागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यातील शाळा 15 जून (Maharashtra School) रोजी सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
We're taking stock of COVID situation, cases rising, but we'll open schools on June 15 with COVID appropriate measures.Masks not mandatory. New SOPs to be issued to schools.Further decision to be taken in accordance with situation: Maharashtra School Education Min Varsha Gaikwad pic.twitter.com/gLxcR42n7b
— ANI (@ANI) June 6, 2022
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही.
त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना त्यांनी एका वाक्यात सांगितलं की, बारावीचा निकाल लवकरच लागेल.
महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट आणि स्वजीवी प्रोग्राम
वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, एक क्रांतिकारी पाऊल शालेय शिक्षण विभाग टाकत आहे. महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्वजीवी प्रोग्राम या कार्यक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. एचसीएलकडून 20 ते 25 हजार विद्यार्थ्यांना यांच्याकडून प्रशिक्षण देणार आहे. ऑफलाइन आणि ऑनलाइनही ट्रेनिंग दिली जाणार आहे. विज्ञान शाखेत गणित विषय घेऊन 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी या कार्यक्रमात प्रवेश घेऊ शकणार आहेत. फक्त प्रशिक्षणच नाही तर नोकरीशी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगड ही कंपनी घालून देणार आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, स्वजीवी उपक्रम सुद्धा आम्ही सगळ्या सरकारी शाळांमध्ये सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या बाबतीत शिक्षण मिळणारा हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे. काही देशांशी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात करार करणार आहोत. आपल्या विद्यार्थ्यांना तिथे जाऊन शिकता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेतच आपल्या आवडीचं शिक्षण मिळावे, यासाठी हे काम आम्ही करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.