1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशभरातील सहा हजार ब्लॉकमध्ये आता ATM मधून मिळणार औषधे

atm
Spread the love

रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा बँक कर्मचारी संपाच्या दरम्यान बँका जरी बंद असल्या तरी देखील आपण एटीएमच्या माध्यमातून कुठेही आणि कधीही बँकेसंदर्भातील व्यवहार करु शकतो. आता औषधांच्या बाबतीतही अशाच प्रकारची व्यवस्था सुरु होणार असून यापुढे आता एटीएममधून औषधे मिळणार आहेत. देशभरातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचे हे ATM मशीन बसवण्यात येणार असल्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास ओषधे उपलब्ध होणार आहेत.

देशभरातील एकूण सहा हजार ब्लॉकमध्ये असे औषधांचे मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर ही औषधे उपलब्ध होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये अशा प्रकारचा करार झाला आहे.

या आधीपासूनच केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मार्फत ब्लॉक स्तरावर अयूर संजिवनी केंद्र सुरु आहेत. आता ही औषधांची एटीएम या केंद्रावर बसवण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधे आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणे आणि इतर प्रकारची औषधे या एटीएममधून मिळणार आहेत. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शक्यतो जेनेरिक औषधे ब्लॉक स्तरावर बसवण्यात येणाऱ्या या एटीएममधून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून या एटीएमना औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन अशा प्रकारची व्यवस्था ही सुरु करण्यात येत असल्यामुळे आता नागरिकांना पैशाप्रमाणे औषधे देखील 24 तास उपलब्ध होणार आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सपाचा राष्ट्रवादीला झटका, दिलेला मतदार संघ अचानक गायब

    January 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्र...

    SC likely to set up technical committee to probe Peg...

    September 23rd, 2021 | DRISHTI SHARMA

    Spread the loveNagpur: The Supreme Court on Thursday said that it is setting up a technical expert committee to inquire in...

    मंकीपॉक्सच्या संसर्गाबाबत केंद्राचा राज्यांना इशारा;...

    July 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: संपूर्ण जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकार आता सतर्क झालं आहे. गुरुवारी केंद्र ...