1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबई-नागपूर महामार्ग येत्या 2 महिन्यात सुरू होणार

ngp-mumbai-highway
Spread the love

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने शिर्डी ते नागपूर प्रवास करता येणार!

महाराष्ट्र राज्याच्या समृद्धीची द्वारं खुली करणारा मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होणार, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात नुकतीच दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून येत्या दोन महिन्यात यातील शिर्डी ते नागपूर हा महामार्ग सुरु होईल.

समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यांतून जाणार आहे. मुंबईतील भारतातील सर्वात मोठे बंदर जवाहरलाल नेहरू बंदर ते नागपूरमधील मिहान एअरपोर्ट यांना जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करून आवश्यक माल संपूर्ण भारतात वेळेवर पोहोचवणे या मार्गाद्वारे शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बुस्टर डोस समजला जाणारा हा बहुचर्चित मार्ग कधी सुरु होतोय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तो पुढील दोन महिन्यात वाहतुकीसाठी खुला होईल, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाविषयी बोलताना म्हणाले की, राज्य सरकार संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणत आहे. सध्याच्या काळात पर्यावरण जपणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्हा या महामार्गाच्या बाजूला ग्रीन झोन उभा करत आहोत. तसेच मुंबई ट्रान्सहार्बर लिंकदेखील सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘हिरकणी’च्या कवितासंग्रह प्रकाशनात कवयित...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनाशिक: मराठीचे शिलेदार संस्थेच्या नाशिक येथील प्रसिद्ध कवयित्री आशा गोवर्धने यांच्या ‘हिरकणी’ य...

    फडणवीसांनी दूर केलेल्या तावडे, बावनकुळेंना केंद्रीय ...

    November 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveफडणवीस साईडलाईनला जाण्याची लक्षणं? भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय नेतृत्वाच्या अलीकडील काही निर्णयां...

    राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरू होणार

    June 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveतर विदर्भातील शाळा २४ ते २५ जूनपासून मुंबई: राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी...