1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नेहरू संग्रहालयाचे नाव ‘पी एम संग्रहालाय’

Spread the love

देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा सन्मान करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आत्तापर्यंत भाजपचा फक्त एकच पंतप्रधान (अटलबिहारी वाजपेयी) झाला, बाकी तर त्यांचेच (काँग्रेससह विरोधक) होते. माजी पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत, पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन त्यांचा आदर केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना सांगितले. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मंगळवारी झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी पक्षाच्या खासदारांना ‘पंतप्रधान संग्रहालया’ला आवर्जून भेट देण्याची सूचना केली.

देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे तत्कालीन निवासस्थान व आत्ता ‘नेहरू संग्रहालया’मुळे प्रसिद्ध असलेल्या तीन मूर्ती भवन परिसरात नवे ‘पंतप्रधान संग्रहालय’ उभारण्यात आले आहे. घटनाकार-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतदिनी, १४ एप्रिल रोजी या संग्रहालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी डॉ. आंबेडकर संग्रहालयाचेही उद्घाटन केले जाणार आहे. पं. नेहरूंची साहित्यसंपदा नेहरू संग्रहालयामध्ये कायम ठेवली जाणार असून नव्या संग्रहालयात उर्वरित १४ माजी पंतप्रधानांच्या सविस्तर कार्याची माहिती देणारे विविध साहित्य लोकांना पाहता येईल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सोमय्यांचा ‘धक्के पे धक्का’ सुरूच

    November 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआणखी चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार: सोमय्या किरीट सोमय्या आज अमरावतीत आले आहेत. सोमय्यांनी पत्रकार पर...

    गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणार; विजयाचे सर्व श्रे...

    March 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveगोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून या निकालांबद्दल भाजपाचे गोव्यातील प्रभ...

    श्रीनगरमधील बीएसएफ कॅम्पमध्ये प्रदर्शनात शस्त्रे

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveश्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) ने गुरुवारी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्...