1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत यश मिळवणारच; देवेंद्र फडणवीस

Spread the love

सध्या आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मुंबई महानगर पालिका हि देशातील प्रमुख महानगरपालिकेपैकी एक आहे. या महापालिकेवर सर्वच पक्ष आपापली सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. अर्थात शिवसेनेचा बाल्लेकिल्ला आहे.

आता याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी महापालिका निवडणुकांसाठी वॉर्डरचना केली किंवा प्रभागरचना केली तरी मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते गोव्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारकडून वॉर्डची पुनर्रचना करण्याच्या नावाखाली आपल्याला हवे तसे वॉर्डची तोडफोड करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाला तसं कळवलं आहे, पण गरज पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

शिवाय राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा यातून दिसतो, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यपालांचं पत्र प्रेसमध्ये दिलेलं नाही. राज्यपालांचं पत्र म्हणजे आदेश नसतो, ते कारवाई करावी असं सांगत असतात, ही आताची परिस्थिती नाही, ही परंपरागत चालत आलेली परिस्थिती आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा आज निकाल

    July 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे झारखंडच्य...

    महाराष्ट्रातील दोन परिचारिकांना ‘फ्लॉरेंन्स ना...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोर...

    आरोग्य विभागाच्या परीक्षेत परत घोळ; विद्यार्थ्यांमध्...

    September 29th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्यातील आरोग्य विभागाच्या पदांवर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या परीक्षा द...