1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उत्तर कोरीयाची अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची चाचणी, अमेरिकेसह जगाला थेट इशारा

missile
Spread the love

उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची जलद चाचणी करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने उत्तर कोरियाचे राज्य माध्यम केसीएनएच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.त्यातच या चाचण्याचा टाइमिंगवरही सगळ्यांचे लक्ष आहे कारण जेव्हा तालिबान अफगाणिस्तानात परतला आहे आणि अमेरिकेला (USA) तिथून परत यावे लागले आहे आणि अशातच उत्तर कोरियाने केलेल्या या चाचण्या . उत्तर कोरियाचे हे पाऊल देखील लक्षात घेण्यासारखे आहे कारण अमेरिकेसोबत अण्वस्त्र नि: शस्त्रीकरणावरून प्रदीर्घ काळ सुरू असलेला संघर्ष अजूनही संपलेला दिसत नाही.

शनिवारी आणि रविवारी झालेल्या चाचण्यांदरम्यान, या क्षेपणास्त्रांनी 1,500 किलोमीटर (930 मैल)इतके अंतर गाठले आहे. केसीएनएने म्हटले आहे की क्षेपणास्त्रांचा विकास उत्तर कोरियाची सुरक्षा अधिक विश्वासार्ह बनविण्याची हमी देतो. देशात तयार केलेल्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे शत्रु शक्तींच्या लष्करी युक्तीला जोरदारपणे रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक साधन ठरणार आहे.

हे उल्लेखनीय आहे की उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियावर प्योंगयांगच्या विरोधात धोरणात्मक शत्रुत्वाचा आरोप केला आहे. उत्तर कोरियाचे आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेबरोबरची त्याची चर्चा 2019 पासून थांबली आहे.तज्ञांचे म्हणणे आहे की क्षेपणास्त्रांची चाचणी करणे उत्तर कोरियाच्या विचारपूर्वक धोरणाचा भाग आहे. स्वत: वर लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध संपवण्यासाठी ते अमेरिकेवर चर्चेसाठी दबाव आणण्यासाठी अशा चाचण्या करत आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इम्रान खान यांची हकालपट्टी झाल्यामुळे संपूर्ण पाकिस्...

    April 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (Tehreek-e-Insaf) (पीटीआय) ने बुधवारी, १३ एप्रिल रोजी आपले सरकार हटवण्यावि...

    श्रीलंकेच्या माजी पंतप्रधानसह १२ नेते अडकले, न्यायाल...

    May 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आर्थिक रसातळाला गेलेल्‍या श्रीलंकेमधील तणाव पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्&#x...

    चीनच्या ‘फुजीयान’मध्ये कोरोनाचे थैमान

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजागतिक स्तरावर कोरोनास महामारी म्हणून घोषित केल्यानंतर कोविडचा सर्वनाश करण्यासाठी हवे तसे प्रयत्न यशस्वी हो...