1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंजाबात राजकीय संकट; अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

amrinder singh
Spread the love

गुजरात पाठोपाठ आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पंजाबच्या राजकारणात भूकंप येणार का? असा प्रश्न आता सर्वांसमोर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याची घटना ताजी असतानाच आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

कोण होणार पंजाबचा मुख्यमंत्री?

नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्या खांद्यावर द्यावी अशी मागणी अनेकांनी केल्यानं त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. आज सुनील जाखड यांनी एक ट्विट केले. ज्यात त्यांनी लिहिले, ‘पंजाब काँग्रेस वाद मिटवण्यासाठी राहुल गांधींनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित आहेत.

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि दोन्ही केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि हरीश राय चौधरी चंदीगडला पोहोचले आहेत. पंजाबमध्ये राजकीय घ़डामोडींना वेग आला आहे. नवे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या घटनांवरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचं जहाज बुडण्याच्या स्थितीत आहे तर कुठे हेलकावे खात आहे. त्यामुळे काँग्रेसची अशी अवस्था झाल्याचं हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी म्हटलं आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    निवडणुकीचा मार्ग मोकळा

    July 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून बांठिया आय...

    बाबासाहेब पुरंदरेंची ‘ती’ इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर...

    November 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveज्येष्ठ इतिहासकार पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ ...

    ज्या लावारीस संजयला बाप नाही माहित नाही त्यास काय कि...

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveखासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत सलग दोन दिवसांपासून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर तसेच केंद्रीय मंत्री नार...