1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जाहीर माफी मागा किंवा चर्चा करा; नितेश राणेंचे जावेद अख्तरांना पत्र

Nitesh Rane
Spread the love

चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे. संघाची तुलना तालीबानशी करणं हा नियोजीत षडयंत्राचा भाग आहे. तालिबानी प्रवक्त्यासारखी भूमिका घेत कुटनितीनं हिंदुत्वाशी तुलना करण्यात आली आहे. हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी?, असा सवाल राणेंनी केला आहे.

आमच्यासाठी तोच हिंदू

कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या सासुसरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव आहे. जो व्यक्ती जिथ राहतो त्यावर प्रेम करतो. मग त्याचा धर्म आणि उपसना पद्धती कोणतीही असली तरी तो आमच्यासाठी हिंदूच आहे. हिंदु धर्माबद्दलच्या अज्ञानाबद्दल आपली दया येतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

तुम्ही तेव्हा कुठे होता?

तुम्हाला महिलांच्या हक्काबद्दल किती माहिती आहे? ट्रिपल तलाकच्या वाईट परंपरेवर तुम्ही कुठे होता?, असा सवाल करतानाच तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो. कोणतही सार्वजनिक व्यासपीठ किंवा न्यूजरूम निवडा या मुद्द्यावर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अन्यथा बिनशर्त माफी मागा, असंही नितेश राणे म्हणाले.

Claim Free Bets

.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजपाने तर ठोकलीच आता मित्रपक्षही आमची ठोकतोय; खा.सं...

    May 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआधी भाजपने आमची ठोकली. आता आमचा मित्रपक्षच इथं आमची ठोकतोय’, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय जाधव यांनी र...

    राज्यातील ‘जिल्हा परीषद’च्या शाळेत मिळणा...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना कालावधीत शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे खरे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या...

    शिवसेनेची गृहमंत्रीपदावर करडी नजर?

    April 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाविकास आघाडीतील गृहकलह चव्हाट्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात न...