1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज ठाकरे यांचा पाठिंबा; पण, एका अटीवर

Spread the love

एसटी कर्मचाऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात राज ठाकरे राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती मनसे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकरांनी दिली.

एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या महत्वाच्या मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मंडळाने आज राज ठाकरे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली व मदतीची मागणी केली.

या भेटीनंतर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला व पक्षाची आणि राज ठाकरे यांची भूमिका मांडली. राज ठाकरे सरकारसोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर बोलणार आहेत. तातडीने यावर ते चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे स्वत: मदत करण्याच्या भूमिकेत आहेत. एकदा सरकारशी चर्चा झाल्यावर कामगारांशी काय बोलायचं ते राज ठाकरे बोलणार आहेत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

मनसे एसटी कर्मचाऱ्यांसोबत आमचे वकील त्यांच्या सोबत कायम आहेत. यापुढेही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत पक्ष असणार सोबत आमचे वकील देखील सोबत असणार आहेत. कायदेशीर लढाई सुरु आहे ते लढतील, असं नांदगावकर यांनी सांगितलं. एकूण २८ संघटनांनी मिळून हा संप जाहीर केला आहे. १ लाख कर्मचाऱ्यांनी सर्व संघटना बाजूला ठेवून संघटनाविरहीत ते त्यांचा लढा आहेत, असं त्यांनी सांगितलं .

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    स्वतःला खरे शिवसैनिक सांगणारे एकनाथ शिंदे कोण आहेत त...

    June 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: एकनाथ संभाजी शिंदे. मूळ गाव : सातारा. ९ फेब्रुवारी १९६४ साली शिंदे यांचा जन्म झाला. कट्टर शिवसैनिक ...

    “आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही; एकनाथ शिंदे

    August 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्र्याचा टोला नाशिक : मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने वारंवार दिल्लीव...

    आधार कार्ड हरविल्यास, कमी पैशात परत मिळवा

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन माहिती पुढं आली असून, य...