1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत :रामदास आठवले

ramdas athavale
Spread the love

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारण हे एनसिबी ड्रग्स प्रकरणामुळे चांगलंच तापलं आहे. क्रुझवर झालेल्या छापेमारीनंतर सत्ताधाऱ्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना घेरले आहे. सत्ताधाऱ्यांकडून वानखेडेंची चौकशी केली जात असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करण्यात येणार आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय, असा आरोपही रामदास आठवले यांनी केला. रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. समीर वानखडे हे एक प्रामाणिक अधिकारी आहेत. गेल्या वर्षभरात समीर वानखेडे यांनी अनेक धाडी टाकून चांगली कामगिरी केली आहे. पण त्यांनी काही चुकीचं केल असेल तर त्यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले असते.

राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणं गरजेचंप्रभाकर साईल या केपी गोसावीच्या बॉडीगार्डचीही चौकशी झाली पाहिजे. प्रभाकर साईल यांच्यावर जर राजकीय दबाव असेल तर त्या राजकीय दबावाचा देखील तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे, अशी मागणीही त्यांनी केली. आर्यनला पकडू नये यासाठी डिलिंग होऊ शकते, पण आर्यनला पकडल्यानंतर ही सगळी डिलिंग कशी होते? सवालही त्यांनी केला. शाहरुख खान यांना पैसे द्यायचेत असतील तर जेव्हा आर्यन खानला पकडलं तेव्हाच ही प्रोसेज झाली असती. पण आता एनसीबीने या प्रकरणात चार्जेस लावलेले आहेत आणि कोर्टात केस स्टँड झालेली आहे. आता या प्रकरणाची डिलिंग चौकशी होऊ शकते?, असा सवालही त्यांनी केला.
मलिक यांच्या जावयाला अमली पदार्थांच्या संदर्भात अटक झालेली आहे. त्याचमुळे अशी वक्तव्य मलिक करत आहेत. नुसती केंद्र सरकारवर आगपाखड करण्याचं काम मलिक करत आहेत. पण वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत, असं सांगतानाच वानखेडे यांचं जर काही चुकत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जिल्हा परिषदेची शासनाकडे ४७५ कोटींची थकबाकी

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्ह्यात ग्रामीण भागात विविध विकासकामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून राज्य ...

    दक्षिण भारतात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love28 जणांचा मृत्यू, 200 रेल्वे गाड्या रद्द मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाने ह...

    जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघाताचे सत्य आले समोर

    January 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveतामिळनाडूमधील कुन्नूर येथील हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 वरिष्ठ अधि...