1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

धक्कादायक…!!! नागपुरात बलात्कार पिडीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

sucide
Spread the love

राज्याची उपराजधानी असलेले नागपूरही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आलेले आहे. नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत एका बलात्कार पीडित अल्पवयीन युवतीने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवतीला तिचा दूरचा नातेवाईक असलेला आरोपी विकास भुजाडे याने जून महिन्यामध्ये फूस लावून बंगळुरूला पळवून नेलं होतं.

या घटनेनंतर पीडित युवतीच्या आईने नागपुरातील जरीपटका पोलिस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी एक महिन्यानंतर जुलै महिन्यात आरोपी आणि पीडित अल्पवयीन युवतीला बंगळुरू येथून नागपुरात आणले होते.

नागपुरात आल्यानंतर पीडित युवतीने तिच्यासोबत झालेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला त्यानंतर पीडितेच्या कुटुंबांकडून नागपुरातील जरीपटका पोलिस स्थानकामध्ये बलात्काराचा आणि पॉक्सो कायद्यांतर्गत विकास भुजाडे या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या संदर्भातला खटला फास्ट ट्रॅक कोर्टत चालविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बलात्कार पीडित अल्पवयीन युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्येही बलात्काराची घटना घडली. एका महिलेवर अत्यंत पाशवी बलात्कार करण्यात आला. या घटनेचं वर्णन मुंबईची निर्भया असंही करण्यात आलं. साकीनाका भागात या महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉडही घालण्यात आला. अत्यंत अमानवी आणि क्रूर अशा घटनेत या महिलेला प्रचंड इजा झाली. नराधमाने तिची आतडीही कापली. त्यामुळे प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्या अवस्थेत या महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबई हादरली होती. आता त्यापाठोपाठ नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला असल्याने शहर असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूर रेल्वे स्थानकावर व्हीलचेअरचे करा ऑनलाईन बुकिंग

    October 12th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमध्य रेल्वे नागपूर डिव्हीजनने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. डीआरएम ऋचा खरे यांच्या मार्गदर्शनात मोब...

    धक्कादायक..! मामीने केलाय अल्पवयीन भाच्याचा लैंगिक छळ

    February 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: संत्रानगरीत गुन्ह्यांच्या घटनात वाढ होताना दिसतेय. पोलीसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह...

    राज्यातील खाजगी शाळांना वेतनेत्तर अनुदान मिळणार..!!

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षापासून खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळांना एक रुपयाही वेतनेतर अनुदान दिले नव्...