1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्य सरकार सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्याविरोधातील 15 वर्षे जुन्या प्रकरणी प्रतिज्ञापत्रक

Spread the love

केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष सध्या टोकाला पोहचला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्य सरकारने सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांच्या पंधरा वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात अचानक उच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले आहे. पुणे सत्र न्यायालयाने तेलगी प्रकरणात जयस्वाल यांच्यासंदर्भात केलेली काही कठोर निरिक्षणे रद्द करण्यासाठी साल 2007 मध्ये सुबोध कुमार जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. आता ज्यात राज्य सरकारने आपले प्रतिज्ञापत्र सादर करत हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती केली आहे.

जेव्हा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हे प्रतिज्ञापत्र अचानक सादर करण्यामागील कारण विचारले तेव्हा या प्रकरणी मध्यस्थ याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याने याची आठवण करून दिली, तसेच ही भूमिका बरीच वर्ष प्रलंबित असलेल्या न्यायदानाच्या कामात आणखीन उशीर होऊ नये, याच उद्देशाने घेतल्याचे स्पष्ट करत याप्रकरणी राज्य सरकारने गरज भासल्यास सविस्तर प्रतिज्ञापत्रही सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.

सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली एक एसआयटी नव्वदच्या दशकातील बनावट स्टँप पेपर घोटाळा उघडकीस येताच स्थापन करण्यात आली होती. अब्दुल करीम तेलगीला 2001 मध्ये अटक करण्यात आली, त्यानंतर न्यायालयाने 2006 मध्ये तेलगीला 30 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. पण तेलगीचा 2017 मध्ये कारागृहातच मृत्यू झाला. पुढे हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘राणी लक्ष्मीबाई’ योजनेंतर्गत ‘हे&...

    June 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: देशभरासहित राज्यातही केंद्र आणि राज्य सरकारद्वारे विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना प्रोत्साहन दे...

    महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, वर्धा तर्फे ...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveऑगस्ट २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार DCPS रकमेच्या १४% शासन हिस्सा जमा करण्याबाबत मागणी जुनी पेंशन हक्क संघट...

    महाराष्ट्रातील 488 शासकीय शाळा होणार ‘आदर्श...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिम...