1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

1 नोव्हेंबर पासून उघडणार व्यावसायिक महाविद्यालये

college
Spread the love

बारावीनंतरच्या विविध सीईटीच्या तारखा जाहीर करतानाच अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापनासह राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये 1 नोव्हेंबरपासून सुरू होतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

येत्या 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी होतील. सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या परीक्षा झाल्यानंतर ही व्यावसायिक महाविद्यालये 1 नोव्हेंबरपासून सुरु होतील, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

तब्बल 15हून अधिक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक यंदा जाहीर झालेले नव्हते. परिणामी तब्बल आठ लाख विद्यार्थी वेटींगवर होते. अखेर मंगळवारी मंत्री सामंत यांनी सीईटींच्या तारखा जाहीर करत दिलासा दिला.

परदेश शिक्षणासाठी उत्पन्न अट कमी झाली..
खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी ङ्गगुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेफ या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून रु.8 लाख इतकी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पूर्वी ही मर्यादा 20 लाख होती आता 8 लाख केल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महिलांवर अत्याचार व्हावेत हे कोणत्या सरकारला वाटतं; ...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेने देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघड...

    नागपूरच्या संजनाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भा...

    July 23rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संजनाची स्तुती नागपूर : इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भार...

    किरीट सोमय्याचा आणखी एक राजकीय ‘बॉम्ब’; ...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप कर...