1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आरोपींवर कठोर कारवाई करू; मुख्यमंत्र्यांचा कल्पिता पिंपळेंना शब्द

Uddhav Thackeray-thefreemedia
Spread the love

“तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा”, असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना फोनवर संवाद साधून दिला.

महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळेंशी बोलणं करून दिलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच त्यांच्यापाठी सरकार खंबीरपणे उभे असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांचा फोनवर संवाद

“जय महाराष्ट्र, नमस्कार ताई. तुमचं कोणत्या शब्दात कौतुक करावं. पण एक तुम्हाला शब्द देतो. तुम्ही जे धैर्य दाखवलं… तुम्ही बरे झाल्यावर तुम्ही पुन्हा जे काम करणार आहात, आता तुमच्या बरोबर आमची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आरोपीला शिक्षा करण्याची चिंता करू नका. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा. मला रोज रिपोर्ट येत असतात. उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी बघू. आरोपींना तर कडक शिक्षा होणार. तुम्ही लवकर ठणठणीत बऱ्या व्हा,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘हिरकणी’च्या कवितासंग्रह प्रकाशनात कवयित...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनाशिक: मराठीचे शिलेदार संस्थेच्या नाशिक येथील प्रसिद्ध कवयित्री आशा गोवर्धने यांच्या ‘हिरकणी’ य...

    अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ; मुंबई उच्च न्या...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. ईडी कारवाई व...

    काळया फिती लावून आशा वर्कर करणार पल्स पोलिओ लसीकरण

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडशन (सीआयटीयू) तर्फे २५ तारखेपर्यंत सर्व थकीत मानधन द्या अन्यथा पोलिओ...