1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

परदेशात पीएचडीसाठी रजा देणे अशक्य; ‘ग्लोबल टीचर’ डिसले गुरुजींनी शाळेसाठी केले तरी काय?

thumbnail-thefreemedia
Spread the love

दीड महिन्यांपासून रजेचा अर्ज टेबलावरच

सोलापूर जिल्हा परिषद परितेवाडी शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी अमेरिकेत पीएच.डी. मिळविण्यासाठी रजेची परवानगी मागितल्यावर शाळेचे काय करणार?. असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी डिसेंबर २१ मध्ये दिलेला अर्ज गेल्या दीड महिन्यांपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहे. रणजित डिसले हे गुरुवारी जिल्हा परिषदेत आले होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची त्यांनी भेट घेऊन परदेशात डॉक्टरेट करण्यासाठी अध्ययन रजेची परवानगी मागितली. त्यावर स्वामी यांनी त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांना भेटण्याचा सल्ला दिला. डिसले यांनी लोहार यांची भेट घेऊन रजेसाठी विनंती अर्ज दिला. त्यावर डॉ. लोहार यांनी डॉक्टरकीसाठीचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही परदेशात गेल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल उपस्थित केला. इतके दिवस रजा शक्य नाही. त्यामुळे अर्जासोबत यासाठी पर्याय तुम्हीच सुचवा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे डिसले यांना अर्ज भरून आणण्यासाठी गावी रिकाम्या हाताने परतावे लागले.

डिसले गुरुजी बाहेर पडल्यानंतर डॉ. लोहार पत्रकारांसमोर म्हणाले की, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचाविण्यासाठी डिसले यांनी नेमके काय केले? गेल्या तीन वर्षांत त्यांनी शाळेसाठी नेमके काय केले, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाबाबतची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यास सांगितले आहे. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही अभिमानास्पद आहे; पण त्यांच्या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेस काय उपयोग झाला? हे तपासावे लागणार आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांना वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणारे नाही.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पुण्यात मनसेच्या पदाधिका-यांचा वाद चव्हाट्यावर

    May 19th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्दा दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्यभरातून हजारो कार्य...

    जगातील सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत ‘महारा...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची...

    जलआक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीसांचा आरोप

    June 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाड्यातील पाणीप्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष जालना: राज्यात सर्वत्र पाणीप्रश्न पेटला असून ते सोडवण्...