1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध करु शकत नाही

Spread the love

व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयात यावर शुक्रवारी सुनावणी झाली. केंद्र सरकारने यावेळी आपल्या आयटी नियमांचा बचाव करतानाच फेसबूकला सुनावले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना केंद्र सरकारने सांगितले की, भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला व्हॉट्सॲप ही विदेशी व्यावसायिक कंपनी विरोध करु शकत नाही. विदेशी कंपनीची भारतातील कायद्याला आव्हान देणारी याचिका योग्य नाही.

आयटी नियमांना आव्हान देणाऱ्या फेसबूकच्या याचिकेचा केंद्र सरकारने विरोध केला. तसेच ही याचिका फेटाळून लावण्याची दिल्ली उच्च न्यायालयाला देखील विनंती केली. विदेशी कंपनीची भारतातील कायद्याला आव्हान देणारी याचिका योग्य नसल्यामुळे फेसबूकची याचिका फेटाळून लावण्यात यावी, असा युक्तीवाद केंद्र सरकारने केला. व्हॉट्सॲप ही विदेशी व्यावसायिक संस्था आहे. आपल्या वापरकर्त्यांची माहितीच्या आधारावर व्यवसाय चालत आहे. देशाच्या सुरक्षेला यामुळे धोका आहे. त्यामुळे अशा व्यावसायिक संस्थेला भारतात स्थान नाही.

व्हॉट्सॲपने केंद्र सरकारने आणलेल्या नव्या आयटी नियमाचा विरोध केला. त्याविरोधात व्हॉट्सॲपने उच्च न्यायालयात आव्हान दिले. केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांनुसार,
व्हॉट्सॲप आणि त्यासारख्या कंपनीला आपल्या मॅसेजिंग अ‍ॅपवर ओरिजनल म्हणजे, जिथून सर्वात आधी मेसेज आला, त्याची माहिती ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. व्हॉट्सॲपकडून याच नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पीएम केअर फंडच्या साईटवरून मोदींचा फोटो हटवा; सरकारल...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोरोना महामारीशी लढण्यासाठी देशभरातून निधी जमा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीएम केअर फंड संकेतस्थळातू...

    देशात उच्च क्रीडा संस्कृती आकार घेत आहे; पंतप्रधान मोदी

    June 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: हरयाणा मध्ये इंद्रप्रस्थ क्रीडांगणावर खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021 ची सोमवारी यशस्वी सांगता झा...

    खुशखबर..! खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता

    May 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनवी दिल्ली- देशात खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडले आहेत. वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून...