1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील 17, 372 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला; नवाब मलिक यांची माहिती

nawab malik
Spread the love

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्ट २०२१ मध्ये १७ हजार ३७२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयम् वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्टअखेर १ लाख ११ हजार ०८३ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मुंबईत ऑगस्टमध्ये ६ हजार १९० बेरोजगारांना रोजगार

मंत्री मलिक म्हणाले, माहे ऑगस्ट २०२१ मध्ये विभागाकडे ३९ हजार ५७४ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार २१६, नाशिक विभागात ६ हजार १८०, पुणे विभागात १० हजार ९८०, औरंगाबाद विभागात ८ हजार १०९, अमरावती विभागात २ हजार ७४० तर नागपूर विभागात २ हजार ३४९ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १७ हजार ३७२ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार १९०, नाशिक विभागात २ हजार १६८, पुणे विभागात ४ हजार ६२९, औरंगाबाद विभागात ३ हजार ७३८, अमरावती विभागात ४४९ तर नागपूर विभागात १९८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जातीयवादी वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी कर...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांन...

    महाराष्ट्र I विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्य...

    April 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्...

    “आम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही; एकनाथ शिंदे

    August 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्र्याचा टोला नाशिक : मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने वारंवार दिल्लीव...