1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशात वीज टंचाई निर्माण होण्याची भीती

Spread the love

देशात गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कोळशाचा पुरवठा राज्य स्तरावर होत नसल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे केंद्रीय पातळीवरून मंत्र्यांकडून कोळसा टंचाई नसल्याचे स्पष्ट केले जात असल्यामुळे कोळशाच्या पुरवठ्याची नेमकी परिस्थिती काय आहे आणि खरच देशात वीजकपात करण्याची वेळ येऊ शकते का? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकाराचा आढावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील दोनच दिवसांपूर्वी महावितरणकडून वीज वापरामध्ये काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आगामी काळात देशाच्या अनेक भागांमघ्ये वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा उत्पादन, पुरवठा आणि वीजनिर्मिती या सर्व बाबींचा आज आढावा घेणार आहेत.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात कोळसा आणि वीज उत्पादन, वितरणाशी संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. अमित शहा यांनी या बैठकीनंतर देशात कोणत्याही प्रकारची कोळसा टंचाई नसल्याचा दावा केला आहे. पण, याआधीच काही राज्यांनी कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पर्यावरणीय प्रश्नाचा सामना करण्यासाठी ‘पंचामृत...

    November 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ नोव्हेंबर) ग्लासकोमधील हवामान बदल शिखर COP 26 परिषदेला संबोधित केलं...

    आता वाजवा रे वाजवा ! ३५+३५+३५+३५….पैशा-पैशांनी...

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveविकासाच्या नावानं चांगभलं…! देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. सरका...

    युवराज सिंग विरोधात गुन्हा दाखल

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअटक होण्याची शक्यता ‘या’ कारणांमुळे अडचणीत मित्रांसोबत लाइव्ह चॅट करताना वापरलेल्या एका शब्दाला...