1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गुजरात मधील ‘इंदिरा गांधी भवन’ पाडणार

Spread the love

त्या जागी होणार ‘नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन’

मोदीजींच्या गुजरातमध्ये इंदिरा गांधींच्या नावावर असलेली इमारत पाडून पंतप्रधान मोदींच्या नावाने इमारत बांधण्याची तयारी सुरू आहे. यासाठीचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. आता गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर बांधकाम सुरू होईल. गांधीनगरमधील इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन पाडून ‘नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन’ बांधण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव गुजरात पंचायत परिषदेच्या बैठकीत आणण्यात आला होता, जो नंतर पासही झाला. ही इमारत खूप जुनी आहे, त्यामुळे ती पाडून नवीन इमारत बांधण्याची परवानगी द्यावी. तसेच, नवीन इमारतीचे नाव पीएम मोदी यांच्या नावावर असावे, असे प्रस्ताव आणताना म्हटले होते.

परिषदेच्या बैठकीत ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची फाइल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पाठवण्यात आली आहे. आता ही इमारत पाडण्याबाबत आणि नवीन नावावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वालाही या प्रस्तावाबद्दल माहिती देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांना माहिती दिल्यानंतर या प्रस्तावाबाबत एक शिष्टमंडळ देखील पंतप्रधान मोदींना भेटणार आहे.

दरम्यान, हा प्रस्ताव समोर आल्यापासून काँग्रेस त्याला कडाडून विरोध करत आहे. भाजपा राजकारण करत असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी ट्वीट मध्ये म्हटलंय की, “यांनी नवीन तर काही केले नाही, रेडीमेड विकायला सुरुवात केली! ज्या गोष्टी ते विकू शकत नाही त्यांची नावे बदलतात. सरदार पटेल स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम आहे. आता इंदिरा गांधी पंचायती राज संस्थेचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवले जाईल. राष्ट्रीय नेत्यांप्रती भाजपाचे मन विषाने भरलेले आहे,” असा आरोप त्यांनी केला.

ही इमारत १९८३ मध्ये बांधली गेली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते आणि माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री होते. त्यावेळी या इमारतीची पायाभरणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. म्हणून या इमारतीचे नाव त्यांच्या नावावरून देण्यात आले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोजागिरीनिमित्त 5 लाख लिटर दुधाची होणार विक्री

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात आतापर्यंत कोरोनामुळे सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. आता सर्वत्र निर्बंध हटविण्यात...

    पीएम केअर्स फंड हा भारत सरकारचा फंड नाही; दिल्ली उच्...

    September 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थिती निवारण निधी (पीएम-केअर्स फंड) या कायद्यांतर्गत धर्मादाय ट्र...

    जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प बंगालमध्ये

    April 6th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकोलकाता: पश्चिम बंगालमध्ये जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात केंद्र ...