1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची मैफल नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार

Spread the love

पण…तारखांचा मेळ जुळता जुळेना!

नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मैफल भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार आहे. शिवाय तारखांचा मेळ जुळत नसल्यामुळे संमेलन नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुढे ढकलेले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये अखेर होणार आहे. मार्च महिन्यातल्या 26 ते 28 मार्चच्या दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. त्या संबंधितांपर्यंत पोहचल्याही होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळांना पत्र पाठवले होते. त्यात जुलै महिन्यात साहित्य संमेलन भरवणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती.

मात्र, त्यावेळेसही त्यांना नकार कळवण्यात आला. मात्र, आता दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आढावा घेऊन दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. नोव्हेंबर महिन्यातील 19, 20, 21 या तीन तारखांचा विचार आयोजकांकडून सुरू होता. मात्र, आता या तारखात बदल करून हे संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. शक्यतो 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होईल, अशी शक्यता आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्र बंदवर राज्य सरकारचा ढोंगीपणा उघड झाला; दे...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र बंदमुळे समाजासमोर महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. हे सरकार ढोंगी असल्याचे फडवणीस य...

    नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveत्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहे...

    25 हजार कोटींचा घोटाळा हा खोटा आरोप, अजित पवारांचं प...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य...