1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाराष्ट्र बंदवर राज्य सरकारचा ढोंगीपणा उघड झाला; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Spread the love

महाराष्ट्र बंदमुळे समाजासमोर महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. हे सरकार ढोंगी असल्याचे फडवणीस यांनी टोला लगावला आहे. लखमीपुर खैरी हिंसाचार प्रकरणी बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना मात्र एकाही पैशांची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अद्भूतपूर्व संकटात आहे. तर हे सरकार आल्यानंतर 2 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचसोबत सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. बांधावर जाऊन 25-50 हजारांच्या मदतीसह अन्य घोषणा या हवेत विरल्या गेल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

पुढे फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारमधीलच घटक पक्षांवर अशी वेळ आली की पूर्वीचे भाजपचे सरकार तरी मदत करायचे. पण या सरकारला आम्ही मदत करतोय आणि त्यांना मदत करायची नाही आहे. त्यामुळे आजचा जो बंद आहे तो ढोंगीपणाचा कळस आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेला हा बंद लखमीपुर खैरी हिंसाचारावर संवेदनशीलता दाखवण्यासाठी नव्हे तर राजकीय पोळी भाजता येईल का अशा संकुचित राजकीय विचाराने केलेला हा बंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यसरकारच्या चौकशीला आव्हान देणारी परमबीर सिंहांची...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास नकार दिला आहे. आपल्या विरोधातील चौकशील...

    मोठा दिलासा! मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांम...

    January 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love२४ तासांत ११,६४७ नवे रुग्ण मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्य...

    तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जलयुक्त शिवार योजना हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’मानला जातोय. पण या योज...