1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारताचे पहिले मानवयुक्त समुद्री मिशन सुरु, समुद्रयान केले लॉन्च

PM-modi
Spread the love

भारताच्या पहिल्या मानवयुक्त सागरी मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शुक्रवारी केला. यासह भारत अशा राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला ज्यांच्याकडे सागरी क्रियाकलाप करण्यासाठी पाण्याखालील वाहने आहेत. यावेळी बोलताना सिंह म्हणाले की, देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. जेव्हा एक भारतीय गगनयान कार्यक्रमातर्गत अंतराळात जातो, तेव्हा दुसरा समुद्रामध्ये अंतरिक्षासारखं नवे काही शोधण्याचा प्रयत्न करतो.

मंत्र्याने ट्विट करत म्हटले की, भारताचे पहिले मानवयुक्त महासागर मिशन समुद्रयान चेन्नईत लॉन्च झाले. अशा पाण्याखालील वाहनांसाठी भारत आता अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छ ऊर्जेसाठी सागरी संसाधनांचा शोध घेण्याचा नवा अध्याय सुरु होत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, ‘आपण प्रत्यक्षात जे योगदान देत आहोत ते केवळ वैज्ञानिक कार्याच्या व्याप्तीपुरते मर्यादित नाही तर ते भारताचा राष्ट्रीय सन्मान निर्माण करण्यातही योगदान देईल.’

‘हे तंत्रज्ञान विज्ञान मंत्रालयाला मदत करेल त्याचबरोबर हजार आणि 5500 मीटर खोल समुद्रात पाममेटॅलिक मॅंगनीज नोड्यूल, गॅस हायड्रेट्स, हायड्रोथर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट्स यासारख्या निर्जीव संसाधनांचा शोध घेण्यासही मदत होईल. मॅनड सबमर्सिबल फिशिंग 6000 (मत्स्य 6000) चे काम पूर्ण झाले असून ते इस्रो, आयआयटीएम आणि डीआरडीओसह विविध संस्थांसोबत सुरु करता येईल,’ अशी माहिती त्यांनी दिली.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शर्जील इमाम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप कायम; उच्च न्...

    March 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी जेएनयूचे माजी विद्यार्थी शरजील इमाम यांच्यावर डिसेंबर 2019 मध...

    आंध्र प्रदेश-ओडिशामध्ये वादळाचा इशारा, या शहरांमध्ये...

    December 4th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveओडिशा आणि आंध्रप्रदेश येथे वादळ ‘जवाद’ ने चांगलाच जोर पकडला आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट सा...

    येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; पीएवर छापा अन् 750 क...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. येडीयुरप्पा यां...