1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

साहित्य संमेलन ही नाशिकचा लौकिक उंचावण्याची संधी; पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

Chhagan Bhujbal
Spread the love

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही; तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आयोजकांनी नियोजन करावे, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ते भुजबळ नॉलेज सिटी येथे ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाबात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, विश्वास ठाकूर, शंकर बोऱ्हाडे, रवींद्र पगार, दिलीप खैरे, डॉ.शेफाली भुजबळ,संजय करंजकर, आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिक शहर व परिसर सुशोभीकरणावर अधिक भर देण्यात यावा. आपल्या दर्जेदार व्यवस्थेतून येणाऱ्या साहित्यप्रेमिंना ज्या सुविधा मिळतील त्यातून नाशिकचे नाव देशपातळीवर पोहचणार आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी शटल बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी. साहित्य संमेलनाचा उत्सव दर्जेदार होण्यासाठी नागरिकांचे सहकार्य तितकेच महत्वाचे असणार आहे. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आदरतिथ्य करणारे नाशिक याद्वारे अवघ्या साहित्य विश्वासमोर जाणार आहे.

Claim Free Bets

ते पुढे म्हणाले, आयोजनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधीं समवेत देखील आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन ही प्रत्येकाचा जबाबदारी समजून कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करू. पर्यटन विभागाचे केंद्र या संमेलन स्थळी उभारण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगताना जिल्हा प्रशासन, माहापालिका प्रशासन पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणांनी आपापल्या परिने यांत योगदान देवून अनेक वर्षे स्मरणात राहील असे दर्जेदार साहित्य संमेलन व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.’

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला ...

    परभणीत होणार वैद्यकीय महाविद्यालय; मुक्तीसंग्रामदिनी...

    September 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुक्ती संग्रा...

    मुंबईतील साठ मजली टॉवरला लागली भीषण आग

    October 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमुंबईतील लोवर परेल परिसरातील बहुमजली टॉवर अविघ्न पार्क येथे दुपारी १२वाजता दरम्यान अत्यंत भीषण आग लागली. अव...