1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गोपीचंद पडळकर – शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नाही, मग त्यांच्याकडे बैठक का?

gopichand padalkar
Spread the love

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम असून मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नसताना ते सरकारच्या बैठका का घेतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पडळकर म्हणाले, “परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं आम्हाला माध्यमांच्या बातम्यांमधून कळालं. पण शरद पवार यांच्याकडे सरकारमधलं कोणतही खातं नसताना त्यांच्याकडे बैठका का घेतल्या जातात?” “गेल्या 13 दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. आमची भूमिका कायम आहे. एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये होऊ शकत नाही तर सरकारकडे काय तोडगा आहे हे त्यांनी सांगावं. सरकार अधांतरी काम करत असून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारने कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात यावं असं आवाहन पडळकर यांनी केलं.
अनिल परब आणि शरद पवार यांच्यात नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. अनिल परब म्हणाले, आता लगेच काही सांगता येणार नाही. आम्ही काही गोष्टींचा अभ्यास करत आहोत. कर्मचारी आणि प्रवासी दोघांच्या सोयीचा मार्ग काढला जाईल असं आश्वासन परब यांनी दिलं.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अटक बेकायदा; गुन्हा रद्द करण्याची केतकी चितळेची मागणी

    June 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveतुरूंगातील केतकीचा मुक्काम वाढला मुंबई :- मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री केतकी चितळे हीने राष्ट्...

    उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘शिवसेना व औरंगाबादची च...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशच्या निवडणुकीत महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादची चर्चा होत आहे. एमआयएमचे अध्यक्ष...

    अयोध्या प्रकरणी राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास...

    May 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत...