1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘शिवसेना व औरंगाबादची चर्चा’; औवेसी सभांमधून देताहेत उदाहरण

Asaduddin Owaisi
Spread the love

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादची चर्चा होत आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांच्यामुळे उत्तर प्रदेशात औरंगाबाद चर्चेत आलं असून, भाजपचा पराभव करण्यासाठी औवेसी त्यांच्या सभांमधून मतदारांना औरंगाबादमधील विजयाचं उदाहरण देत आहेत.

‘औरंगाबादमध्ये २१ वर्षांपासून असलेल्या शिवसेनेच्या खासदाराचा एआयएमआयएमने पराभव केला.’ ‘औरंगाबादमध्ये आम्ही मुस्लिम मिळून पराभूत करू शकतो, तर इथे तर शिवसेनेचा छोटा भाऊ भाजपला हरवू शकत नाही का?’ ही विधानं आहेत खासदार असदुद्दीन औवेसी यांची.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमच्या तिकीटावर लोकसभेत गेले. खासदार जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. याच विजयाचा आधार घेत औवेसी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर औवेसींनी लक्ष्य केंद्रीत केलं असून, आता ते उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी करत आहेत.

Claim Free Bets

असदुद्दीन औवेसी यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या शंभर जागा लढवण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने औवेसींनी प्रचारही सुरू केला असून, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसच्या सरकारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. हे सगळं करत असतानाच औवेसी वारंवार आपल्या भाषणांमध्ये औरंगाबादचा उल्लेख करताना दिसत आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंकजा मुंडे: सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस...

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजकारणात पद किंवा सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस्कृतीत नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मु...

    ममतांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप घेणाऱ्यांना संजय राऊ...

    December 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या दौऱ्यावर आल्या त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यावर ...

    मशिदींवरील भोंग्यासाठी दिलेल्या ‘अल्टिमेटम’वर राज ठा...

    May 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेप...