1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अमेरिकेत करोनाच्या विळख्यात आता लहान मुले

thumbnail-thefreemedia
Spread the love

अमेरिकेत सध्या वेगाने फैलावत असलेल्या करोनाने लहान मुलांना विळख्यात घेण्यास सुरवात केली असून ही जगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अॅकॅडमी ऑफ पेडीअॅट्रिक्सच्या ताज्या अहवालानुसार गेल्या आठवड्यात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान १,४१,९०५ मुले करोना संक्रमित झाल्याची पुष्टी झाली आहे. गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण ३२ टक्के वाढले आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यात करोना संक्रमितांच्या एकूण संखेत मुलांची संख्या १/३ असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे. अमेरिकेत एकूण लोकसंख्येत लहान मुलांचे प्रमाण २२ टक्के आहे. संक्रमित मुलांचे प्रमाण ३ टक्के असून ६८ लाख मुले संक्रमित झाली आहेत. अर्थात लहान मुलांमध्ये करोना मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे.

अमेरिकेच्या सहा राज्यात करोनामुळे एकही मुलाचा मृत्यू झालेला नाही. संक्रमित मुलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे वेळोवेळी मुलांना इंफ्ल्यूएन्झा, मेनिन्जायटीस, गोवर, हेपिटायटीस लसी दिल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर मध्ये ५ ते ११ वयोगटातील ८३०० मुले रुग्णालयात दाखल होती त्यातील १७२ मुलांचा मृत्यू झाला. करोनाचा प्रसार वेग अधिक असल्याने शाळा बंद केल्या गेल्या. त्यामुळे १२ लाख मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम दिसून आला. शाळा पुन्हा सुरु झाल्यावर पुन्हा करोना प्रसार वेग वाढला असून आता सर्व वयोगटातील मुलांमध्ये करोना संक्रमण दिसून येत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युरोपात एका महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५५ ट...

    November 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतात पुढचे ३ महिने काळजी घेण्याची गरज युरोपमध्ये गेल्या महिनाभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ५५ टक्क्...

    दुबई एक्सपोमध्ये दाखविण्यात येणार ६ चित्रपट, एक मराठ...

    November 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्राचे सा...

    टोपीवर तब्बल ७३५ अंडी ठेवत रचला जागतिक विक्रम

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआपल्यापैकी कितीजण एका टोपी किती अंडी ठेऊ शकता? याचे तुमचे उत्तर एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन असे असेल. प...