1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

युरोपात एका महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५५ टक्के वाढ

covid cases-thefreemedia
Spread the love

भारतात पुढचे ३ महिने काळजी घेण्याची गरज

युरोपमध्ये गेल्या महिनाभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ५५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत चिंता व्यक्त कली असून, सध्या युरोपावर लक्ष केंद्रित करण्य़ात आले आहे. युरोप आणि मध्य आशियातील ५३ देशांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग हा जगासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. युरोपासोबतच चीन आणि अमेरिकेतही कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे त्या त्या देशांची सरकारे चिंतेत आहेत. भारतात सुद्धा उत्सवांचा काळ सुरु आहे, त्यामुळे हजारो लोकं कमेकांकडे जातायेत आणि बाजारपेठांमध्ये गर्दी होते आहे. अशा स्थितीतच सोशल डिस्टन्सिंग, मास्क या बाबींकडे दुर्लक्षही वाढलंय, त्यामुळे देशातही कोरोनाचे रुग्ण येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

युरोपात कसे वाढतायेत रुग्ण

युरोपात गेल्या चार आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या ५५ टक्क्यांनी वाढली आहे. एका ठवड्यात युरोपात १.८ कोटी नवे रुग्ण समोर आले आहेत. जे त्यापूर्वीच्या आठवड्यापेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहेत. अर्ध्याहून अधिक युरोपचे लसीकरण झाल्यानंतरही रुग्णसंख्येत होणारी वाढ चिंताजनक मानण्यात येते आहे. काही देशांमध्ये ७० टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसंख्या वाढते आहे. यात इटली, जर्मनी, पोर्तुगाल, ग्रीस, फ्रान्स या देशांचा समावेश आहे.

भारतात कोरोनाची काय स्थिती?

देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे, दरदिवशी देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होते आहे. सध्या दरदिवशी १२ हजार नवे रुग्ण सापडत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा आकडा २३ हजारांच्या घरात होता. नव्या केसेस या काही मोजक्या राज्यांत सापडत आहेत. लसीकरणाचा विचार केला तर देशात २२ टक्के लोकसंख्येचं दोन्ही डोसचं लसीकरण झालं आहे. ५२ टक्के लोकसंख्येने एक लस घेतलेली आहे.

भारतासाठी चिंतेची बाब

सण-उत्सवांच्या काळात जनतेकडून होणारी बेपर्वाई ही सर्वात चिंतेची बाब मानण्यात येते आहे. दिवाळीच्या काळात अनेकांनी एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास केला आहे. त्यात रेल्वे, विमाने, बसेस या सगळ्यांचा समावेश आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अमेझॉनचे मालक ‘जेफ बेजोस’ उभारणार खाजगी ...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी पहिले खाजगी अंतराळ केंद्र उभारण्या...

    पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्यसंगीत परिषदेच्या अ...

    February 16th, 2022 | Ankita Deshkar

    Spread the loveसा इंटरनॅशनल,भारता तर्फे शनिवार दि.५ मार्च २०२२ रोजी पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्य संगीत परिषद घेण्यात य...

    चीनच्या ‘फुजीयान’मध्ये कोरोनाचे थैमान

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजागतिक स्तरावर कोरोनास महामारी म्हणून घोषित केल्यानंतर कोविडचा सर्वनाश करण्यासाठी हवे तसे प्रयत्न यशस्वी हो...