1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशातील सरकारी संस्था तोट्यात; मग नोक-या कुठून देणार?

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

अर्थमंत्र्यांना सतीश चव्हाण यांचा रोखठोक सवाल

यंदाचा अर्थसंकल्प हा विकासाचा आभास निर्माण करणारा आहे. सर्व सामान्य जनता, शेतकरी, नोकरदार वर्ग, उद्योजक, बेरोजगार, विद्यार्थी आदींची या अर्थसंकल्पातून पूर्णपणे निराशा झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात ज्या कृषी क्षेत्राने आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला तारले. त्या कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करायला हवा होता. साठ लाख नव्या नोकर्‍या उपलब्ध करून देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मुळात सरकारी कंपन्या, बँका, वित्तीय संस्था तोट्यात आहेत म्हणून याचे खाजगीकरण केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य युवकांना नोकर्‍या कशा देणार? याचे उत्तर मात्र अर्थमंत्र्यांनी दिलेले नाही. अशी प्रतिक्रिया आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.

खाजगीकरणाच्या वाटेवर चालणारे हे केंद्र सरकार फक्त भाषणबाजीमध्ये ‘विकासदर’ दाखवते. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या लघु उद्योजकांना या अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा होत्या. मात्र त्यांच्या पदरी सुध्दा घोर निराशा पडली आहे. विद्यार्थ्यांना ‘ऑनलइन’ शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू असे केंद्र सरकार सांगत असले तरी काही गाव, तांड्यावर आजही साधी वीज पोचू शकली नाही तिथे ‘ऑनलइन’ शिक्षण देणार तरी कसे? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला.

देशाला कररूपाने सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून दिला जातो. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात एकूण २ लाख २० हजार कोटींचा केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले जवळपास ४८ हजार कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. मात्र या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे साडेपाच हजार कोटी रूपयेच परत मिळाले. त्यामुळे केंद्र सरकारने किमान निधी वाटपात तरी महाराष्ट्रावर अन्याय करू नये ऐवढीच माफक अपेक्षा आहे. प्रत्येक वेळी सर्वसामान्यांसाठीचा अर्थसंकल्प असे म्हणणारे केंद्र सरकार मात्र ‘कॉमनमॅन’च्या हातात मात्र काहीच देत नाही ही मोठी शोकांतिका आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    योजनेला बदनाम करणं योग्य ठरणार नाही: देवेंद्र फडणवीस...

    October 28th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveफडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेली देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवा...

    भाजपच्या माजी मंत्र्याने केला मोठा गौप्यस्फोट

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love१२ आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत शिवसेनेचे १२ आमदार आणि काँग्रेस राष्ट्रवादीचेही अनेक आमदार भाजपच्या संप...

    प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ता...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजाणून घ्या काय आहे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी असलेल्या जगदिशपुरा भागात पोलीस कोठडीत एका व्यक्त...