1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ब्राऊझर Google Chrome चा लोगो बदलला !असा असेल लोगोमधील बदल

Spread the love

नागपूर: जगभरात लोकप्रिय असलेले इंटरनेट ब्राऊझर Google Chrome याचा लोगो ८ वर्षांनी बदलला गेला आहे. आता Google Chrome चा लोगो अगदी नवीन डिझाईनमध्ये बघायला मिळेल. याआधी कंपनीने २०१४ मध्ये Chrome च्या डिझाईनमध्ये बदल केले होते. यावेळेस Chrome मध्ये केलेल्या बदलमुळे लोगो अगदी ठळक आणि आणि अजून आकर्षक दिसून येईल.

( Google Chrome )गुगल क्रोमच्या नवीन लोगोबद्दल (Google Chrome Logo)बोलायचे झाले तर तुम्हाला त्यात थोडा बदल दिसेल. जुन्या लोगोची ग्रीन सेंटर सीमेवर थोडे गडद हिरवा रंग होता, ते बदलानंतर काढून टाकण्यात आले आहे. नवीन लोगोमध्ये तुम्हाला लाल, पिवळे आणि हिरवे रंग अधिक स्पष्ट आणि सपाट दिसतील. मध्यभागी असलेला निळा रंग आता पूर्वीपेक्षा जास्त गडद दिसतो. Chrome मधील सर्व रंग आता पूर्वीपेक्षा गडद झाले आहेत.

एका डिझायनर एल्विन ने क्रोमच्या नवीन लोगोबद्दल ट्विट करून माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये नवीन लोगोची अनेक झलक दाखवण्यात आली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘गुगल क्रोमच्या कॅनरी व्हर्जनच्या अपडेटमध्ये तुमच्यापैकी काहींना आज नवीन लोगो दिसला असेल. होय! आम्ही आठ वर्षांत प्रथमच Google Chrome चे ब्रँड आयकॉन बदलत आहोत. नवीन लोगो लवकरच तुमच्या डिव्हाइसवर दिसण्यास सुरुवात होईल.”

आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या हा नवीन लोगो फक्त गुगल क्रोमच्या कॅनरी व्हर्जनवरच दिसतो, पण लवकरच हा बदल गुगल क्रोमच्या स्टँडर्ड व्हर्जनवरही दिसेल. गुगल क्रोमच्या नवीन लोगोमध्ये कोणतीही शॅडो नाही. यामध्ये वापरलेले रंग अधिक तेजस्वी असून त्यांचे प्रमाण वेगळे आहे. क्रोमच्या जुन्या लोगोच्या तुलनेत नवीन लोगोमध्ये मध्यभागी निळे वर्तुळ मोठे करण्यात आले आहे. नवीन लोगो उपकरणानुसार तयार करण्यात आला आहे. Google Chrome च्या 100 आवृत्तीसह, नवीन लोगो सर्व उपकरणांवर दृश्यमान होईल.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    Google विकणार Potato Chips; पॅकेटवर खास तुमचं नाव लि...

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveप्रसिद्ध टेक फर्म गुगल (Google) लवकरच पुढील फ्लॅगशिप फोन Pixel 6 लाँच करणार आहे. पिक्सेल 6 ची छायाचित्रं आध...

    चीनी भाषेमुळे सुंदर पिचाईनी लावला गुगल ट्रान्सलेटचा शोध

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगरज ही नवीन शोधाची जननी असते असे म्हटले जाते. भारतीय वंशाचे आणि अल्फाबेट या नामवंत सोफ्टवेअर कंपनीचे सीईओ स...

    महाराष्ट्रातील सौंदर्य आता मोबाईल अँपवर

    September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the love२७ सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या एका ...